रविवार, दिनांक ९ जून २०२४
लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी रविवारी संध्याकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहे. मोदी यांच्यासोबत त्यांच्या सहकारी मंत्रिमंडळाचा देखील शपथविधी होत असून या खास सोहळ्याला सुमारे आठ हजार पावणे उपस्थित राहणार आहे यात परदेशी पाहुण्यांचा देखील समावेश आहे.
भारताच्या शेजारील आणि हिंद महासागर प्रदेशातील देशाच्या सन्माननीय प्रमुखांना या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. शपथविधी सोहळ्याला श्रीलंकेचे अध्यक्ष रानी विक्रम सिंगे मालदीवचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मोइज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफिफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशचे पंतप्रधान प्रविंद कुमार, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कुमार दहल प्रचंडा, भुतानच्या पंतप्रधानांस अन्य काही राष्ट्राच्या प्रमुखांनी शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण स्वीकारले आहे.
त्यामुळे या शपथविधी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने परदेशी पाहुणे उपस्थित राहतील. शपथविधी सोहळ्या दिवशी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी संध्याकाळी आयोजित केलेल्या मेजवानी समारंभात देखील हे नेते उपस्थित राहणार आहेत.


