Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पंतप्रधान मोदींच्या नव्या रालोआ सरकारमध्ये दोघांना डच्चू, या सहा जणांना मंत्रीपदाची लागणार लॉटरी तर अजितदादांच्या पदरी निराशाच! बघा अंतिम संभाव्य मंत्र्यांची यादी…
राजकारण

पंतप्रधान मोदींच्या नव्या रालोआ सरकारमध्ये दोघांना डच्चू, या सहा जणांना मंत्रीपदाची लागणार लॉटरी तर अजितदादांच्या पदरी निराशाच! बघा अंतिम संभाव्य मंत्र्यांची यादी…

पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या टर्मला सुरुवात
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/06/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, दिनांक ९ जून २०२४

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या पर्वाला आज सुरुवात होत आहे. आज सायंकाळी मोदी रालोआ सरकारमध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेत असून त्यांच्यासोबत अन्य काही मंत्र्यांचा शपथविधी समारंभ होणार आहे. काही तासांवर येऊन ठेपलेल्या या शपथविधी सोहळ्यात राज्यातील सहा जणांना संधी मिळण्याची चिन्हे असून दोघा मंत्र्यांना डच्चू दिल्याचे बोलले जात आहे. 

यांचा पत्ता कट … मोदी सरकार – २ मध्ये लघु आणि सूक्ष्म उद्योग खाते असलेले मंत्री नारायण राणे यांना नव्या सरकारमध्ये संधी मिळणार नसल्याचे समोर येत असल्याने त्यांची मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता मावळली आहे. राणे यांच्यासोबतच अर्थ राज्यमंत्री असलेले भागवत कराड यांना देखील नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे या विद्यमान दोन्ही मंत्र्यांचा नव्या मंत्रिमंडळात पत्ता कट करण्यात आला आहे.

राज्यातून यांना संधी मिळण्याची शक्यता … नव्या संभाव्य मंत्र्यांच्या नावाची चर्चा शनिवारी दिवसभर रंगली होती. यापैकी काहीजणांना दिल्लीहून फोन आले असून त्यांना तातडीने दिल्लीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले असल्याच्या बातम्या समोर येत आहे. नव्या मंत्रिमंडळात राज्यातून भाजपचे नितीन गडकरी, पियुष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, शिवसेना शिंदे गटातर्फे प्रतापराव जाधव आणि रिपाईचे रामदास आठवले यांची नावे निश्चित मानली जात आहे.

अजितदादांच्या पदरी निराशा … नव्या मंत्रिमंडळ शपथविधी समारंभावेळी तूर्तास तरी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पदरी निराशा आले आहे. राष्ट्रवादीच्या कोठ्यातून प्रफुल्ल पटेल अथवा सुनील तटकरे यांच्या नावाची चर्चा होती, मात्र सध्या या दोन्ही नावांवर काट मारण्यात आल्याने तूर्तास तरी अजितदादा पवारांच्या पदरी निराशा आहे. 

पंतप्रधानांनी चहापानावेळी संभाव्यमंत्र्यांशी साधला संवाद … मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या चहापानाच्या बैठकीला एनडीएचे संभाव्य मंत्री उपस्थित होते. या सर्वांबरोबर मोदींनी संवाद साधला असून त्यांना शंभर दिवसांच्या रोड मॅपविषयी माहिती देत सूचना केल्या असल्याचे समोर येत आहे. या बैठकीला संभाव्य मंत्री उपस्थित होते. 

मंत्रीपदाच्या शपथेसाठी या खासदारांना आले फोन … अमित शाह, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा, शिवराज सिंह चौहान, निर्मला सीतारमन, अर्जुनराम मेघावाल, कमलजीत सेहरावत, रक्षा खडसे, पियुष गोयल, मुरलीधर मोहोळ, ज्योतिरादित्य शिंदे, के. अन्नामलाई, मनोहरलाल खट्टर, राव इंद्रजीत सिंह, सुरेश गोपी, ज्युएल ओरम, किशन रेड्डी, बंदी संजय कुमार, गिरिराज सिंह, रवनीत बिट्टू, अन्नपूर्णा देवी, सीआर पाटिल, अजय टम्टा, एस. जयशंकर, पंकज चौधरी, कमलेश पासवान, सुधीर गुप्ता, हरदीप सिंग पुरी, सरबानंद सोनोवाल, भुपेंद्र यादव, प्रल्हाद जोशी, मनसुख मांडविय (सर्व भाजप)

एनडीएचमधील मित्र पक्ष … जीतनराम मांझी (हिंदुस्थान आवाम मोर्चा), जयंत चौधरी (राष्ट्रीय लोकदल), अनुप्रिया पटेल (अपना दल), डी. आर. चंद्रशेखर (तेलगू देसम पार्टी), के. राम मोहन नायडू (तेलगू देसम पार्टी), प्रतापराव जाधव (शिवसेना), रामनाथ ठाकुर (जनता दल युनायटेड), एच. डी. कुमारस्वामी (जनता दल सेक्युलर), सुदेश महतो (ऑल झारखंड स्टुडंट्स युनिअन), चिराग पासवान (लोक जनशक्ती पार्टी पासवान), रामदास आठवले (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले)

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vasant-launch-video.mp4
Advt
anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,387
पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधी संभाव्य मंत्री
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.