रविवार, दिनांक ९ जून २०२४
केंद्रात सत्ता स्थापन करण्याची वेळ अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत केंद्रात एनडीएचे (NDA) सरकार स्थापन करत आहे. राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू पंतप्रधान आणि नव्या मंत्र्यांना राजभवनात शपथ देतील.
पंतप्रधान मोदींनी बहुमताचा आकडा गाठत आपले संख्याबळ २९३ वर नेले आहे. यात एकट्या भाजपच्या खासदारांची संख्या २४० एवढी असून त्या खालोखाल भाजपाचे मित्र पक्ष असलेल्या टीडीपी आणि जेडीयु खासदारांची संख्या आहे.
एक नजर भाजपाच्या मित्र पक्षांच्या खासदार संख्येवर… यांच्या बळावर मोदी पंतप्रधान
भाजपा – २४०
टीडीपी – १६
जेडीयु – १२
शिवसेना (शिंदे) – ०७
एलजेपी (आर) – ०५
जनसेना पार्टी – ०२
आरएलडी – ०२
आजसू – ०१
हम – ०१
एनसीपी (अजित पवार) – ०१
अपना दल (एस) – ०१
एजीपी – ०१
एसकेएम – ०१
युपीपीएल – ०१


