Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नगरमधून अपहरण झालेल्या ११ महिन्याच्या चिमुकल्याची संगमनेर पोलिसांच्या मदतीने सुटका
गुन्हेगारी

नगरमधून अपहरण झालेल्या ११ महिन्याच्या चिमुकल्याची संगमनेर पोलिसांच्या मदतीने सुटका

नगर रेल्वे पोलीस, संगमनेर पोलिसांची कामगिरी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/06/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, २४ जून 

अहमदनगर रेल्वे स्टेशन परिसरातून अज्ञात महिलेने ११ महिन्याच्या अपहरण झालेल्या चिमुकल्याची संगमनेर पोलिसांच्या मदतीने रविवारी रात्री सुटका करण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला पुढील चौकशीसाठी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अपहरण झालेल्या बालकाला संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी येथून ताब्यात घेत त्याच्या पालकांकडे सोपविण्यात आले.

अहमदनगर रेल्वे स्टेशन परिसरातील एका महिलेने स्वानंद आकाश खडसे या ११ महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण केले होते. या संदर्भात नगर रेल्वे पोलिसांकडे गुन्हा नोंद करण्यात आला. सदरचे अपहरण झालेले बालक संगमनेरमध्ये असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती.

नगर रेल्वे पोलीसचे उपनिरीक्षक एस. जी. लोणकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह संगमनेर शहर पोलीस ठाण्यात येऊन यासंदर्भात पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांना माहिती दिली. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक पोलीस पथकाच्या मदतीने दोन पथके तयार करून संशयित आरोपीच्या मागावर पाठविण्यात आले. रेल्वे पोलिसांसोबत स्थानिक पोलिसांनी समांतर तपास करत गुंजाळवाडी शिवारात नवनाथ विष्णू धोत्रे यांच्या राहत्या घरातून या चिमुकल्याला ताब्यात घेण्यात आले. तसेच नवनाथ धोत्रे याला पुढील कारवाईसाठी पोलिसांनी नगरला नेले आहे.

संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फडोळ, पोलीस हेडकॉन्स्टेबल गोविंद मोरे, राजु झोले, अशोक पारधी, पोलीस नाईक पांडुरंग पटेकर, पोलीस कॉन्स्टेबल अजित कुऱ्हे, शितल बहिरट व अहमदनगर रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एस. जी. लोणकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल बी. आर. गौळी, पोलीस कॉन्स्टेबल पी. बी. गडाख, पोलीस नाईक इरफान शेख, पोलीस कॉन्स्टेबल देशमुख, अविनाश खरपास, आसाराम येवले, किरण तोरमल, मंगल आहेर, महिला पोलीस कॉन्स्टेबल वनिता समिदर यांनी केली आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vasant-launch-video.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,837
अपहरण पोलीस रेल्वे पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला एक नवी…

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.