Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

June 4, 2026

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर एलसीबीचा छापा!
गुन्हेगारी

संगमनेरात सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर एलसीबीचा छापा!

पकडलेला आरोपी म्हणतो मीच मालक
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 25, 2024Updated:June 25, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, २५ जून

जिल्ह्यातील पोलीस आणि पोलिसांच्या विविध पथकांच्या हप्तेखोरीला कंटाळून संगमनेरातील मटका धंदा बंद करण्याची राळ उठवणाऱ्या मटका किंग मंडळींकडून शहरात मटका जोमात सुरु ठेवण्यात आला आहे. नगर एलसीबीने शनिवारी शहरातील दिल्ली नाका या ठिकाणी कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकत एकाला पकडल्याने शहरातील मटका काही ठिकाणी बंद तर काही ठिकाणी सुरूच असल्याचे समोर आले आहे.

बशीर इसाक शेख, (वय ३० वर्षे, रा. मोमीनपुरा, संगमनेर) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस चौकशीत त्याने मटका मालक आपणच असल्याची कबुली पोलिसांना दिली असली तरी मूळ मालक मात्र कारवाईतून बचावले असल्याचे बोलले जाते.

दिल्ली नाका, संगमनेर येथील देशी दारु दुकानाच्या पाठामागे बोळीमध्ये कल्याण नावाचा हारजितीचा मटका जुगार लोकांना चिठ्यांवर आकडे लिहून देऊन मटका अड्डा सुरू असल्याची माहिती थेट नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती.

स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी पोलीस हवालदार सचिन अडबल, रवींद्र कर्डिले, मनोज गोसावी, ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस नाईक विशाल गवांदे, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली असता बशीर शेख हा मटका चालवताना दिसून आला त्यास पोलिसांनी जागेवरच ताब्यात घेतले. १२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सर्व प्रकारचे अवैध धंदे सुरू असलेला संगमनेर तालुका हा नगर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. मटका, जुगार अड्डे, गांजा तस्करी या शहरात तेजीत सुरू आहे. गोवंश हत्या तर नेहमीच्याच आहेत. या सर्व धंद्यांवर छापेमारी सुरू असली तरी ते कधीही बंद होत नाहीत. वसुलीच्या मोहिमांमुळे या धंद्यांना संरक्षण मिळत असल्याचे बोलले जात आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vasant-launch-video.mp4

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,072
एलसीबी पोलीस मटका
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

June 4, 2026

सहा मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जण ताब्यात

June 4, 2026

संगमनेरमध्ये बुलेटच्या सायलेन्सरमधून मोठे आवाज काढणाऱ्या तरुणावर पोलिसांची कारवाई, दुचाकी जप्त

June 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

By अनंत पांगारकरJune 4, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | मुंबई/बुलढाणा: भारतीय जनता पक्षाला देशात लोकशाही नको असून, ‘इलेक्शन सिस्टिम’…

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

June 4, 2026

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

June 4, 2026

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

June 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.