Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जिल्हा शल्यचिकित्सक साहेब, राजकीय आसामी भाऊसाहेब कुटेला नेमका कोणता आजार जडलाय?
गुन्हेगारी

जिल्हा शल्यचिकित्सक साहेब, राजकीय आसामी भाऊसाहेब कुटेला नेमका कोणता आजार जडलाय?

दूधगंगा आर्थिक घोटाळा प्रकरणात नेमकं चाललंय तरी काय
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/06/2024Updated:25/06/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

दूधगंगा पतसंस्था आर्थिक घोटाळ्यातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे सिव्हिल रुग्णालयात करतोय आराम! ठेवीदार आक्रमक, चौकशीची मागणी

मंगळवार, २५ जून 

दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या सुमारे ८१ कोटीहून अधिक रुपयांच्या ठेवीला चुना लावत आर्थिक अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी, राजकीय आसामी असलेला भाऊसाहेब कुटे वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली गेल्या आठवडाभरापासून रुग्णालयात आराम करत असल्याचे समोर आले आहे. आरोपीला तुरुंगातून दूर ठेवण्यासाठी संगमनेरातील त्या बहुचर्चित डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून कुटेच्या पाहुणचारासाठी तालुकास्तरावरील वैद्यकीय यंत्रणेपाठोपाठ आता जिल्हास्तरावरील यंत्रणा सरसावली असल्याचा आरोप होत आहे.

दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्याचे प्रकरण आरोपी बडी राजकीय असामी असल्याने सुरुवातीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. तब्बल नऊ महिने मुख्य आरोपीला न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर देखील तपास यंत्रणा त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नव्हती. त्यानंतर आरोपी स्वतःहून हजर झाल्यानंतर यंत्रणांनी त्याच्यासाठी पायघड्या टाकल्याचा आरोप होत आहे. ठेवीदारांच्या हजारो, लाखो रुपयांच्या ठेवी बुडण्याच्या मार्गावर असल्याने मनस्ताप झालेल्या अनेक ठेवीदारांचा मृत्यू झाला, मात्र याचे कोणतेही सोयर सुतक यंत्रणांना दिसत नसल्याचे दिसते.

काही दिवसांपासून कुटे न्यायालयीन कोठडीत संगमनेरच्या दुय्यम कारागृहात होता. मात्र अचानकपणे आरोपीला संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येऊन तेथून दोन ते चार दिवसांनी लगेच नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. आरोपीला कोणता आजार झाला आहे ? कशासाठी आरोपीला नगरला हलविण्यात आले आहे ? याबाबतची माहिती देण्यास सुरुवातीला नेहमीप्रमाणे टाळाटाळ करण्यात आली. विशेष म्हणजे आरोपीला नगर येथे पाठवण्याइतके मोठे कारणही नव्हते असे आता बोलले जात आहे.

त्यामुळे कुटेवर गेल्या सात दिवसांपासून नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेमका कोणता उपचार चालू आहे हे लपविण्यात आले आहे. अगदी किरकोळ तपासण्या करण्यासाठी त्याला व्हाया नगरहून पुणे येथे पाठवण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा ठेवीदारांमध्ये सुरू आहे. दरम्यान ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’च्या पडताळणीमध्ये आरोपी काही दिवसांपासून उपचारासाठी आला असून सिव्हिल सर्जन डॉ. संजय घोगरे यांना याची माहिती सुद्धा नव्हती असे त्यांचे म्हणणे आहे. संपर्क करूनही माहिती देण्यास टाळाटाळ केली जात होती. चौकशी करावी लागेल असे त्यांचे म्हणणे असल्याने साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे जखम मांडीला आणि मलम शेंडीला असा प्रकार तर नाही ना अशीदेखील शंका निर्माण झाली आहे.

तुरुंगात रहाण्याऐवजी आजाराचे कारण करून हॉस्पिटलमध्ये जामीन मिळेपर्यंत ‘आरामात दिवस काढण्याचा प्लॅन’ आरोपीचा असून वैद्यकीय प्रशासन आणि महसूल प्रशासन या दोघांकडूनही संगणमताने आरोपीला मदत केली जात असल्याचे आरोप आता होऊ लागले आहेत. दरम्यान हवालदिल झालेल्या ठेवीदारांनी आता या प्रकरणात न्यायालयानेच लक्ष घालत न्याय देण्याची मागणी जोर धरत आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vasant-launch-video.mp4

ठेवीदार आक्रमक, चौकशीची मागणी..

आमच्या आयुष्यभराच्या कमाईचे वाटोळे करून पैसा आणि राजकीय सत्तेचा वापर करीत मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे हा संगमनेर येथील वैद्यकीय, प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संगणमत करून तसेच नगर सिव्हिल हॉस्पिटलशी सुद्धा संगणमत करुन तुरुंगवासापासून दूर राहण्यासाठी आजाराचे कारण काढून गेल्या सात दिवसांपासून नगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आराम करत आहे. तर त्याआधी संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात देखील दोन-चार दिवस आराम केलेला आहे. तुरुंगात राहण्याचे टाळून रुग्णालयात आराम करण्याचा हा आरोपीचा डाव आहे. त्यामुळे आरोपीला नेमके काय झाले आहे? असा कोणता मोठा आजार झाला आहे ? याबाबत आम्हाला शंका आहे. तरी कृपया नगरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत खुलासा करावा, अशी मागणी अनिल जोंधळे, कैलास देशमुख, एस. टी. देशमुख, हेमंतराजे पवार, प्रकाश गुंजाळ, डॉ. विक्रमसिह ढोमसे, प्रभाकर राहणे आदी ठेवीदारांनी केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,474
आर्थिक घोटाळा दूध गंगा पतसंस्था भाऊसाहेब कुटे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला एक नवी…

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.