Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सुसंस्कृत संगमनेरला अवैध धंद्यांचा कलंक, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर बनलाय अवैध धंद्यांचे माहेरघर; पोलिसांचे झोपेचे सोंग
गुन्हेगारी

सुसंस्कृत संगमनेरला अवैध धंद्यांचा कलंक, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर बनलाय अवैध धंद्यांचे माहेरघर; पोलिसांचे झोपेचे सोंग

अहमदनगर एलसीबीचे पथक, अपर पोलीस अधीक्षकांचे पथक, पोलीस उपाधीक्षकांचे पथक आणि शहर पोलीस निरीक्षकांचे पथक यावर कारवाया का करत नाही
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/07/2024Updated:08/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार ७ जुलै | अनंत पांगारकर 

पोलीस उपअधीक्षक, प्रांत अधिकारी कार्यालय, संगमनेर शहर पोलीस ठाणे आणि दारूबंदी विभागाच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील शक्तिमान टॉवर्समध्ये अवैध धंदे बोकाळले असून याकडे पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने हॉटस्पॉट बनलेल्या या परिसरात गंभीर घटना घडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

सुसंस्कृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेरला अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यात अयशस्वी ठरलेल्या अधिकाऱ्यांच्या अवकृपेने अवैध धंद्यांचा कलंक लागला आहे. शहरातील अवैध धंदे राजरोसपणे सुरू असून पोलिस आणि संबंधित यंत्रणांच्या एजंट मार्फत होणाऱ्या अर्थपूर्ण नात्यामुळे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे.

विविध विकास कामे, मोठी बाजारपेठ आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून संगमनेरने राज्यात नावलौकिक प्राप्त केला आहे. एकेकाळी दंगलीचे शहर म्हणून ख्याती असलेले संगमनेर आता सुसंस्कृत शहर म्हणून उदयास आले आहे. मात्र या सुसंस्कृततेला गालबोट लागू शकेल असे अवैध व्यवसायाचे जाळे संगमनेरात मोठ्या प्रमाणात फोपावले आहे. त्यातच छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन पुतळ्यांच्या परिसरातील अवैध धंदे सध्या चांगलेच चर्चेत आहे. त्यामुळे या परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे शहराच्या शांततेला गालबोट लागण्याची चिन्हे आहेत.

ज्यांच्यावर या अवैध धंद्याचा बीमोड करण्याची जबाबदारी आहे, त्या सर्वच यंत्रणा हप्तेखोरीत बरबटल्याने याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे. परिणामी हप्तेखोरीत अडकलेले अधिकारी बदलून जातील मात्र संगमनेरकरांना याचे परिणाम भोगावे लागतील अशी स्थिती आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

अशी आहे स्थिती…

छत्रपती शिवाजी महाराज, मारुती मंदिर, हॉस्पिटल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून काही पावलांवर शंभर मीटरच्या आत असलेली शक्तिमान टॉवर्स ही इमारत अवैध धंद्यांचा हॉटस्पॉट बनली आहे. जवळच मुस्लिम समाजाचे प्रार्थनास्थळ देखील आहे. या ठिकाणी बिंगो गेम, लोटो गेम, ऑनलाइन लॉटरी, गांजा सिगारेट, गुटखा, मटका याबरोबरच जुगार आणि अन्य गोष्टी देखील सर्रासपणे सुरू असतात. याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असून एरवी शहरात कारवायांचा बडगा उभारणारे अहमदनगर एलसीबीचे पथक, अपर पोलीस अधीक्षकांचे पथक, पोलीस उपाधीक्षकांचे पथक आणि शहर पोलीस निरीक्षकांचे पथक यावर कारवाया का करत नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 11,739
अवैध धंदे पोलीस संगमनेर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर…

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.