Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कोतुळ ते संगमनेर प्रांत कार्यालय ५५ किलोमीटरची ट्रॅक्टर रॅली, ३०० पेक्षा जास्त ट्रॅक्टर्स रॅलीमध्ये सहभागी; विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारावर दूध व शेण ओतून केला सरकारचा निषेध
आंदोलन

कोतुळ ते संगमनेर प्रांत कार्यालय ५५ किलोमीटरची ट्रॅक्टर रॅली, ३०० पेक्षा जास्त ट्रॅक्टर्स रॅलीमध्ये सहभागी; विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारावर दूध व शेण ओतून केला सरकारचा निषेध

प्रशासनाची उडाली होती धावपळ
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेरला येऊ शकतो तर लोणीलाही जाऊ शकतो, दुग्ध विकास मंत्र्यांना इशारा

मंगळवार, २३ जुलै

दूध दरासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांच्या मागण्यांची दखल न घेतल्यामुळे अकोले व संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंजाब पॅटर्नचे अनुकरण करत शेकडो ट्रॅक्टर एकत्र करून आज जबरदस्त रॅली काढली. कोतुळ ते संगमनेर ५५ किलोमीटर अंतर पार करत ३०० पेक्षा जास्त ट्रॅक्टर संगमनेर शहरात धडकले. रॅली प्रांताधिकारी कार्यालयावर धडकण्यापूर्वीच शासकीय विश्रामगहाजवळ अडविण्यात आली. त्यामुळे विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारामध्येच शेण ओतून सरकारचा निषेध करण्यात आला.

दुधाला प्रतिलिटर ४० रुपये भाव मिळावा, या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून कोतुळ येथे गेले १८ दिवस शेतकरी बेमुदत सत्याग्रहाला बसले आहेत. सकाळीच अकोले तालुक्यातील कोतुळ येथून ही रॅली काढण्यात आली होती.

अकोले येथे पोलीस प्रशासनाने ट्रॅक्टर रॅली अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र संगमनेरला जायचेच यावर आंदोलक ठाम राहिले. अखेरीस पोलीस प्रशासनानेही आंदोलनांच्या मागण्यांची तीव्रता लक्षात घेत व आंदोलकांच्या भावना लक्षात घेता रॅलीस सहकार्य केले. संगमनेर येथील मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टरची लांबच लांब रांग उभी करत आंदोलकांनी विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारावर दूध ओतून व ट्रॉली भर शेण ओतून आपला संताप व्यक्त केला.

दुधाच्या आंदोलनाचे केंद्र असलेल्या नगर जिल्ह्यात दुग्धविकास मंत्री राहतात. आंदोलनाच्या अठराव्या दिवसानंतर सुद्धा त्यांनी आंदोलनाची पुरेशी दखल घेतलेली नाही याबद्दल संताप व्यक्त करणाऱ्या भावना आंदोलकांनी यावेळी व्यक्त केल्या.

कोतुळ वरून ३०० पेक्षा जास्त ट्रॅक्टर ५५ किलोमीटरचे अंतर पार करीत संगमनेरला येऊ शकतात तर अशीच ट्रॅक्टर रॅली लोणीपर्यंतही निघू शकते किंबहुना अकोले, संगमनेर व नगर जिल्ह्यातील सर्व संघटना व आंदोलकांना एकत्र करत ट्रॅक्टर रॅलीचा एल्गार मंत्रालयालाही धडक देऊ शकतो. सरकारने ही वेळ शेतकऱ्यांवर आणू नये अशा प्रकारची भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली.

संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांना यावेळी निवेदन देण्यात आले. आजच्या आंदोलनानंतरही कोतुळ येथे सुरू असलेले बेमुदत आंदोलन सुरूच राहणार असून आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी जिल्हाभरातील सर्व कार्यकर्ते व सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन पुढील कृती ठरवण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

आंदोलनाचे नेतृत्व डॉ. अजित नवले, विनोद देशमुख, सदाशिव साबळे, अभिजित सुरेश देशमुख, नामदेव साबळे, बाळासाहेब गीते, प्रकाश देशमुख, भाऊसाहेब देशमुख, अभिजित भाऊसाहेब देशमुख, गणेश जाधव, योगेश बाळासाहेब देशमुख, गौरव बनोटे, सुनील आरोटे, राजेंद्र देशमाने, दीपक पवार आदींनी केले. अमित भांगरे, संदीप शेणकर, गुड्डू शेटे, नितीन नाईकवाडी, महेश नवले, शुभम आबंरे, दत्ता ढगे, सागर वाकचौरे, संदीप दराडे आदींनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

संगमनेर तालुक्याच्यावतीने बाबा ओहोळ यांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त केला. चिखली या ठिकाणी दूध वाटून तर धांदरफळ या ठिकाणी केळी व नाश्ता वाटून संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादकांनी आंदोलनाप्रती आपली सद्भावना व्यक्त केली.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,285
अकोले अजित नवले कोतुळ ट्रॅक्टर रॅली दूध आंदोलन संगमनेर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: संगमनेर शहराजवळील कोल्हार-घोटी रस्त्यावरील समनापूर फ्लॉवर मार्केट चौफुली येथील…

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.