Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रस्त्यावर स्टंटबाजी करणाऱ्यांना उपअधीक्षकांचा हिसका… दुचाकी जप्त, मोठा आवाज करणारे हॉर्न, सायलेन्सर तोडले, दोघांवर गुन्हा दाखल
गुन्हेगारी

रस्त्यावर स्टंटबाजी करणाऱ्यांना उपअधीक्षकांचा हिसका… दुचाकी जप्त, मोठा आवाज करणारे हॉर्न, सायलेन्सर तोडले, दोघांवर गुन्हा दाखल

हुल्लडबाजी, स्टंटबाजी करणाऱ्यांचे व्हिडिओ, फोटोग्राफ पाठवा, संगमनेरकरांना पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आवाहन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, ३० जुलै

मोठ्या आवाजातील फटाके फोडणारे सायलेन्सर, कंटाळा बसविणारे सायलेन्सर, चित्रविचित्र हॉर्न वाजवत रस्त्यावर स्टंटबाजी करत रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका पोहोचविण्याची शक्यता निर्माण करणाऱ्या हुल्लडबाजांवर संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी कारवाईचा हिसका दाखविला आहे.

सोमवारी संगमनेर शहरातील शासकीय विश्रामगृह ते अमृतवाहिनी कॉलेज पर्यंतच्या जुन्या मार्गावर दोन मोटरसायकलस्वारांनी स्टंटबाजी करत आपल्या दुचाकी भरधाव वेगाने नेल्या होत्या. याच दरम्यान या रस्त्यावरून जाणाऱ्या काही दक्ष नागरिकांनी या हुल्लडबाज, स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांचे फोटोग्राफ्स, व्हिडिओ काढून ते संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक वाघचौरे यांना व्हाट्सअपवर पाठविले होते.

बघा व्हिडिओ…

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/07/VID-20240730-WA0010.mp4

 

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/07/VID-20240730-WA0011.mp4

वाघचौरे यांनी हे व्हिडिओ फोटोग्राफ्स बघितल्यानंतर ताबडतोब दोन्ही मोटर सायकलस्वार तरुणांचा शोध घेण्याच्या आदेश पोलिसांना दिले. पोलीस अंमलदार राहुल डोके, राहुल सारबंदे, ट्राफिकचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश जगधने, पिचड, झोळे या कर्मचाऱ्यांनी अवघ्या काही वेळातच या दुचाकीस्वारांचा शोध घेत त्यांना पोलीस उपअधीक्षकांपुढे हजर केले. या हुल्लडबाज तरुणांकडील मोटार सायकल जप्त करण्यात आल्या असून कर्ण कर्कश करणारे दोन्ही मोटार सायकलचे हॉर्न तोडून टाकण्यात आले आहे. तसेच एका गाडीचे मोठा आवाज करणारे सायलेन्सर मॉडिफाइड असल्यामुळे ते देखील काढून टाकण्यात आले.

याशिवाय दोन्ही मोटार सायकल स्वारांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून दोघा स्टंटबाज तरुणांकडून मोटार वाहन कायद्याखाली प्रत्येकी अडीच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यामुळे संगमनेरकर नागरिकांनी पोलीस उपअधीक्षक वाघचौरे यांनी केलेल्या कारवाईचे स्वागत केले आहे. पोलिसांनी या कारवाईत सातत्य ठेवण्याची देखील मागणी दक्ष नागरिकांनी केली आहे.

संगमनेरकर नागरिकांना आवाहन…

शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की जर कोणी रस्त्यावर या पद्धतीने स्टंटबाजी करत असल्यास किंवा नियमबाह्य पद्धतीने सायलेन्सर लावून कर्णकर्कश आवाज निर्माण करत असल्यास अशा गाडीचे व चालकाचे फोटो आम्हाला शेअर केल्यास त्यांच्यावरदेखील वरील प्रमाणेच कठोर कारवाई करण्यात येईल. – सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपअधीक्षक, संगमनेर-अकोले.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,751
कारवाई सोमनाथ वाघचौरे स्टंटबाजी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर…

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.