Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर वगळता पोलीस ॲक्शन मोडवर, एलसीबीचे अवैध व्यवसायांवर छापे, २२ जण ताब्यात
गुन्हेगारी

संगमनेर वगळता पोलीस ॲक्शन मोडवर, एलसीबीचे अवैध व्यवसायांवर छापे, २२ जण ताब्यात

स्थानिक पोलीस, एलसीबीसह जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत शहरातील अवैध धंदे अद्याप येईनात
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, ३० जुलै 

अवैध धंद्यांवर कारवाईसाठी जिल्हा पोलीस दलाने विशेष मोहीम हाती घेतली असल्याचे वृत्त असून अहमदनगर एलसीबीने १६ ठिकाणी टाकलेल्या छाप्यात २२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. एकीकडे पोलीस ॲक्शन मोडवर आले असले तरी, दुसरीकडे मात्र संगमनेरमध्ये सर्व काही आलबेल असून येथील अवैध धंदे नियमितपणे सुरळीत सुरू आहेत. या धंद्यांवर कारवाईसाठी पोलिस नावाच्या यंत्रणेकडे वेळ नसल्याचे दिसते.

जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कारवाया करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांनी पोलिस ठाण्यांना भेटी देऊन कारवायांचा आढावा घेतला आहे. पोलिस ठाण्यांबरोबरच स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मात्र अवैध धंद्यांवरील कारवाईचे स्वरूप पाहता या कारवाया नेहमीप्रमाणे फार्स ठरण्याची शक्यता आहे.

अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी पोलीस दलातील भ्रष्टाचारा विरोधात चार दिवस उपोषण केले. लंके यांनी पोलीस दलातील भ्रष्टाचार आकडेवारीसह समोर आणल्याने जिल्हा पोलीस दलाची पुरती नाचक्की झाली आहे. असे असले तरी मोठ्या प्रमाणात अवैध माया मिळवून देणारे हे धंदे बंद करण्याचे धाडस सध्याच्या पोलीस दलातील कोणताही अधिकारी अद्याप तरी दाखवू शकला नाही.

स्थानिक पोलीस यंत्रणेपासून ते गृहमंत्रालयापर्यंत या अवैध व्यवसायाची पाळेमुळे खोलवर रुजली असल्याचे बोलले जाते. भारतीय जनता पक्षातील कार्यक्षम म्हणून ओळखले जाणारे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देखील खासदार लंके यांच्या उपोषणा संदर्भात आणि जिल्हा पोलीस दलाच्या झालेल्या नाचक्की संदर्भात मौन बाळगून आहे. त्यामुळे पोलीस दलातील पाळीमुळे मंत्रालयापर्यंत रुजली असल्याचा चर्चेला अप्रत्यक्षपणे दुजोरा मिळत आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत दक्षिण नगर मधील नगर शहर, श्रीगोंदा, नेवासा, शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील ऑनलाईन बिंगो, हातभट्टीची दारू विक्री, देशी, विदेशी दारू अड्ड्यांवर १६ ठिकाणी छापे टाकत २ लाख ४३ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

दरम्यान संगमनेरमधील अवैध धंद्यांच्या मंगळवारी आढावा घेतला असता हे सर्व धंदे सुरळीतरित्या सुरू होते. स्थानिक पोलीस, एलसीबीसह जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत शहरातील अवैध धंदे अद्याप आले नसल्याने नाशिकच्या विशेष महानिरीक्षकांनी अथवा त्यांच्या पथकाने शहरात एक चक्कर मारली तरी वस्तुस्थिती समोर येईल, अशी येथील अवैध धंद्याची स्थिती आहे. (क्रमशः – २)

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,020
अवैध धंदे संगमनेर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.