Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महाभारतात अर्जुनाला माशाचा डोळा दिसला तसाच आपल्याला पक्षाने दिलेला कार्यक्रम दिसायला हवा, मुख्यमंत्री शिंदेंनी केलेली कामे… – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
राजकारण

महाभारतात अर्जुनाला माशाचा डोळा दिसला तसाच आपल्याला पक्षाने दिलेला कार्यक्रम दिसायला हवा, मुख्यमंत्री शिंदेंनी केलेली कामे… – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

योजनांची दिली माहिती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/08/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, ०१ ऑगस्ट

महाभारतामध्ये जसा अर्जुनाला फक्त माशाचा डोळा दिसत होता, तसाच आपल्याला पक्षाने दिलेला कार्यक्रम दिसायला पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

डॉ. गोऱ्हे छत्रपती संभाजी नगर जिल्हा दौऱ्यावर असून बुधवारी सुभेदारी विश्रामगृह येथे आयोजित महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. संभाजीनगर जिल्ह्यातील मध्यपूर्व, पश्चिम, गंगापूर, वैजापूर, कन्नड विधानसभा क्षेत्रातील, नांदेड, बीड आणि लातूर जिल्ह्यातील महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या.

गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, एसटी बस मध्ये महिलांना पन्नास टक्के प्रवास सवलत, लेक लाडकी लखपती योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, उच्च शिक्षणासाठी मुलींना मोफत शिक्षण, युवकांना स्टायपंड अशा योजनांची माहिती बैठकीत दिली.

विरोधक आपल्याबद्दल काय वाईट नेरेटिव्ह पसरवत आहे याकडे आपण लक्ष न देता महाभारतात जसा पोपटाचा डोळा अर्जुनाला दिसला तसाच आपल्याला पक्षाचा कार्यक्रम दिसायला हवा. महिलांचा आत्मविश्वास वाढवा यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढाकार घेतला असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नुसती योजना नसून, एखाद्या महिलेला कोणी अपमानित करून बोलत असेल तर मुख्यमंत्री हे भाऊ म्हणून त्या महिलेच्या पाठीशी उभे आहेत, ही भावना त्या महिलेच्या मनात असायला हवी असे देखील डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

प्रतिभा जगताप, रंजना कुलकर्णी, सविता किवंडे, शिल्पाराणी वाडकर, चंद्रकला बांगर, शारदा घुले, कलाबाई ओझा, सुलभा भोपळे आदी महिला पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या जिल्हा समन्वयक तेजस्विनी केंद्रे यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 707
छत्रपती संभाजी नगर डॉक्टर नीलम गोऱ्हे शिवसेना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.