Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

“वाकचौरे आता थांबणार नाहीत…!” – एका विधानाने पेटलेली राजकीय चर्चा

June 4, 2026

रोटरी क्लबच्या जयपूर फूट वितरण उपक्रमातून दिव्यांगांना स्वावलंबनाची नवी दिशा; संगमनेरमध्ये ११४ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

June 4, 2026

आज गुरुवार, ४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता थांबवा… उच्च न्यायालयात याचिका, मंगळवारी होणार सुनावणी
राजकारण

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता थांबवा… उच्च न्यायालयात याचिका, मंगळवारी होणार सुनावणी

संजय राऊत यांनीही केली टीका
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 3, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई | प्रवीण पुरो 

करातून येणारा पैसा फुकट वाटण्यासाठी नाही, त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता थांबविण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर मंगळवारी तातडीची सुनावणी होणार असून याप्रकरणी काय निकाल येतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

नवी मुंबईतील नावेद मुल्ला यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा १४ ऑगस्टला वितरीत करण्यात येणारा पहिला हप्ता थांबवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली आहे.

विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे. मात्र ही योजना भ्रष्ट कृती असून मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रकार आहे. निवडणुकीत पैसे वाटल्यास निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाते. मात्र, सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू नसल्यामुळे निवडणूक आयोग कारवाई करू शकत नाही. त्यामुळेच या योजनेची घोषणा करण्यात आली आहे.

एरव्ही सामान्य लोकांनी साधं चॉकलेट घेतलं तरी त्यावर जीएसटी भरावा लागतो. अन्य गोष्टींवरही सामान्य जनता २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी कर भरते. हे पैसे फुकट वाटण्यासाठी नाहीत. लाडकी बहीण योजना म्हणजे करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आहे, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला स्थगिती देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून विरोधक सातत्याने टीका करताना दिसत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, विधानसभा निवडणुकीला दोन महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही. त्यामुळे या लाडक्या बहि‍णींची काळजी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनाच घ्यावी लागणार आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना लाडक्या बहि‍णींचा जो उमाळा आला आहे, तो केवळ दोन महिन्यांसाठी आहे.

दोन महिने बहिणींच्या खात्यात पैसे टाकतील, महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर उभा करतील आणि मग हे तिघेही पळून जातील, असा दावा राऊत यांनी केला. तसेच लाडक्या बहिणी योजनेचा पैसा हा तिजोरीतील आहे, तर फुटलेल्या आमदारांसाठीचा पैसा हा ठेकेदारीचा असल्याचा आरोपही त्यांनी केला.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,438
नावेद मुल्ला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुंबई उच्च न्यायालय संजय राऊत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

“वाकचौरे आता थांबणार नाहीत…!” – एका विधानाने पेटलेली राजकीय चर्चा

June 4, 2026

महायुतीत बंडखोरीची चिन्हे; शिवसेनेचं डोकं उडवण्याचं काम भाजप करत आहे: अब्दुल सत्तार यांच्या आरोपाने महायुतीत खळबळ

June 1, 2026

“81 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून सरकारची मोठी फसवणूक; महिलांच्या विश्वासाला तडा” – बाळासाहेब थोरातांचा घणाघात

June 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पत्रकारिता

“वाकचौरे आता थांबणार नाहीत…!” – एका विधानाने पेटलेली राजकीय चर्चा

By अनंत पांगारकरJune 4, 20260

संपादकीय अहिल्यानगरच्या राजकारणात सध्या शिवसेना, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील घडामोडी वेगाने बदलत आहेत.…

रोटरी क्लबच्या जयपूर फूट वितरण उपक्रमातून दिव्यांगांना स्वावलंबनाची नवी दिशा; संगमनेरमध्ये ११४ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

June 4, 2026

आज गुरुवार, ४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 4, 2026

संगमनेर पालिकेच्या कारवाई विरोधात शिंदे शिवसेना आक्रमक; भाजीची पाटीच मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात नेत नगरसेविका साक्षी सूर्यवंशींचे ‘गांधीगिरी’ आंदोलन

June 3, 2026

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.