Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत अत्याधुनिक कोल्ड स्टोरेजसाठी ११ कोटी – पणन मंत्री अब्दुल सत्तार
राजकारण

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत अत्याधुनिक कोल्ड स्टोरेजसाठी ११ कोटी – पणन मंत्री अब्दुल सत्तार

शिर्डी एमआयडीसीत एक हजार कोटींची गुंतवणूक - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/08/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

राहाता बाजार समितीला २५ एकर जमीन हस्तांतरीत

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारातील विविध विकासकामांचे भूमिपूजन

रविवार, ११ ऑगस्ट 

शिर्डी | महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आणि उप माहिती कार्यालय

राहाता व शिर्डी परिसरात डाळींब व फुलांचे चांगले मार्केट आहे. तेव्हा या परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल सुरक्षित रहावा यासाठी राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत अत्याधुनिक कोल्ड स्टोरेजसाठी ११ कोटी रूपये मंजूर करत असल्याची व आगामी काळात बाजार समितीत शेतकरी भवन बांधण्यासाठी दीड कोटी रूपये मंजूर करण्यात येतील‌, अशी घोषणा राज्याचे पणन, अल्पसंख्याक विकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी केली.

साकुरी-राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारातील विविध विकासकामांचे भूमिपूजन पणन, अल्पसंख्याक विकासमंत्री सत्तार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. व्यासपीठावर माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, उपसभापती आण्णासाहेब कडू पाटील, उपनिबंधक गणेश पुरी, शिर्डी प्रांताधिकारी माणिक आहेर आदी उपस्थित होते.

सत्तार म्हणाले, राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत अत्याधुनिक कोल्ड स्टोरेजसाठी ११ कोटी रूपये मंजूर करण्यात येतील. यात ६ कोटींचे अनुदान असणार आहे. याचठिकाणी शेतकरी भवनासाठी दीड कोटी रुपये मंजूर करण्यात येतील. या शेतकरी भवनाच्या भूमिपूजनासाठी मी स्वतः उपस्थित राहील.

कृषीमंत्री असतांना सावळी विहीर येथील कृषी विभागाची ७५ एकर जमीन पशु वैद्यकीय महाविद्यालयासाठी पशुसंवर्धन विभागाकडे हस्तांतरित केली. याची आठवणही पणनमंत्री सत्तार यांनी यावेळी दिली.

शिर्डी एमआयडीसीत एक हजार कोटींची गुंतवणूक…

महसूलमंत्री विखे पाटील म्हणाले, आगामी काळात शिर्डी एमआयडीसीत १ हजार कोटींची गुंतवणूक होऊन २ हजार तरूणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. शिर्डी व परिसरातील शेतकऱ्यांचा हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. गोदावरी कालव्यातून तालुक्यातील सर्व पाझर तलाव, कालवे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गोदावरी कालव्यांच्या नुतनीकरणासाठी शंभर कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. येत्या काळात कृषी उत्पन्न बाजार समितीत निर्यात सुविधा केंद्रामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल ५४० कोटींचे आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राहाता तालुक्यात २ कोटींचे अनुदान देण्यात आले आहे. अतिशय पारदर्शक कारभार राहाता मार्केट कमिटींने केला आहे. देशभरातील शेतमालाचे भाव राहाता बाजार समितीत पाहता येतात.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अहमदनगर जिल्ह्यात ७ लाख व राहाता तालुक्यात ५४ हजार महिलांना लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांना शंभर टक्के वीज बील माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

राहाता बाजार समितीला २५ एकर जमीन हस्तांतरीत…

यावेळी महसूलमंत्री व पणनमंत्र्यांच्या हस्ते शेती महामंडळाची २४ एकर जमीन (९ हेक्टर ८२ आर) राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीला हस्तांतरित करण्यात आली. जमीन हस्तांतरणाचा सातबारा बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.

बाजार समिती आवारातील संरक्षण भिंत, अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ते, वॉटर ड्रेनेज लाईन, ऑक्शन प्लॅटफार्मचे काँक्रिटीकरण, कांदाशेड अशा १० कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. बाजार समितीचे ज्ञानदेव चौधरी यांनी प्रास्ताविक केले. आभार संतोष गोर्डे पाटील यांनी मानले.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 917
अब्दुल सत्तार राधाकृष्ण विखे राहता बाजार समिती
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.