Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » “मला १५ वर्षे शिक्षा ठोठावली तरीही मी सत्य बोलायचं थांबणार नाही, न्यायव्यवस्था कोणाची तरी रखेल झाली आहे; शिक्षेनंतर खासदार संजय राऊत यांचा हल्लाबोल… अपील करण्यासाठी शिक्षेला ३० दिवसांची स्थगिती
राजकारण

“मला १५ वर्षे शिक्षा ठोठावली तरीही मी सत्य बोलायचं थांबणार नाही, न्यायव्यवस्था कोणाची तरी रखेल झाली आहे; शिक्षेनंतर खासदार संजय राऊत यांचा हल्लाबोल… अपील करण्यासाठी शिक्षेला ३० दिवसांची स्थगिती

खासदार राऊत यांची प्रतिक्रिया आली समोर
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/09/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, २६ सप्टेंबर

“पंतप्रधान गणपतीचे मोदक खायला सरन्यायाधीशांकडे जातात. मग भ्रष्टाचाऱ्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या आमच्या सारख्या लोकांना न्याय कसा मिळेल? हे अपेक्षितच होतं. अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं होतं की न्यायव्यवस्था कोणाची तरी रखेल झाली आहे, हे स्पष्ट दिसतंय. आम्ही त्या कोर्टाचा आदर करतो, आम्ही नक्की वरच्या कोर्टात जाऊ”, असे सांगत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि न्यायव्यवस्थेवर टीका केली आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर मेधा सोमय्या यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. या प्रकरणात माझगाव कोर्टाने त्यांना दोषी ठरवले असून त्यांना १५ दिवसांची शिक्षा सुनावली आहे. तर, त्यांना न्यायालयाने २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला असून ही रक्कम मेधा यांना नुकसान म्हणून देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यानंतर  खा. राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

मीरा भाईंदर येथील शौचालयाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मी केला नव्हता. मीरा भाईंदर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी हा दावा केला होता. तसंच, मीरा भाईंदरचे आमदार प्रताप सरनाईक यांनी या भ्रष्टाचाराविरोधात चौकशी करण्याकरता मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलं होतं. याविरोधात विधानसभेतही चर्चा झाली होती. विधानसभेतील चर्चेनंतर एक आदेशही पारीत करण्यात आला होता. मी फक्त यावर प्रश्न विचारले होते”, असं स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिलं.

मग आम्हाला न्याय कसा मिळणार?

“या प्रकरणी मी पुरावेही दिले होते. पण न्याय व्यवस्थेचं संगीकरण झालं आहे. तरीही आम्ही न्यायालयाचा आदर करतो. आम्ही सेशन कोर्टात जाणार, आमच्याकडे पुरावे आहेत, आम्ही जनतेकडे जाणार. हे चालत राहतं. हेच आम्ही अपेक्षित होतो”, असंही ते म्हणाले. “मला १५ वर्षे शिक्षा ठोठावली तरीही मी सत्य बोलायचं थांबणार नाही. मी आता याप्रकरणी वरच्या कोर्टात जाणार आहे. आणि हा जो पुरावा खालच्या कोर्टाने मान्य केला नाही, सार्वजनिक क्षेत्रात भ्रष्टाचार होतो, जनतेच्या पैशांचा अपहार होतो, त्यासंदर्भात आम्ही काही बोलायचं नाही. कारण न्यायव्यवस्थेचं संगीकरण झालं आहे. ज्या देशाचे सरन्यायाधीश गणपतीचे लाडोबाचे मोदक खायला पंतप्रधानांना बोलावतात, त्या देशात आम्हाला काय न्याय मिळणार?” असा सवालही त्यांनी विचारला.

अपील करण्यासाठी शिक्षेला ३० दिवसांची स्थगिती…

दरम्यान अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवण्यात आलेले उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना कोर्टाकडून १५ दिवसांची कैद सुनावण्यात आली होती. मात्र आता राऊतांना मोठा दिलासा मिळाला आहे. दंडाधिकारी कोर्टाकडून संजय राऊतांना अंशत: दिलासा मिळाला असून सत्र न्यायालाच्या निकालाविरोधात अपील करण्यासाठी शिक्षेला ३० दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. कोर्टाने १५ हजाराच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 983
संजय राऊत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.