Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेरात ४२ लाखाची बेहिशोबी रोकड पकडली, हवाल्याची रक्कम असल्याचा संशय; पोलीस तपास सुरू
गुन्हेगारी

गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेरात ४२ लाखाची बेहिशोबी रोकड पकडली, हवाल्याची रक्कम असल्याचा संशय; पोलीस तपास सुरू

संगमनेरमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, १७ ऑक्टोंबर

संगमनेर – विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असतानाच संगमनेरमध्ये अहिल्यानगर गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल ४२ लाख १५ हजार रुपयांची बेहिशोबी रक्कम हस्तगत करण्यात यश मिळविले. पोलिसांनी पकडलेली रक्कम हवाल्याची असल्याचा संशय असून त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहे.

अहिल्या नगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने ही कारवाई केली असल्याची माहिती समोर येते. पोलीस अधीक्षकांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध व्यावसायिकांचा, बेहिशोबी मालमत्ता बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार संगमनेरमध्ये ही कारवाई करण्यात आली.

पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार अतुल लोटके, अमृत आढाव, मनोज गोसावी, रमीझराजा अत्तार यांच्या पथकाने ही कारवाई केली. शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पार्श्वनाथ गल्लीतील सहदेव ज्वेलर्सच्या वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत भावेश पटेल आणि आशिष सुभाष वर्मा हे त्यांच्या साथीदारासह आपल्या उत्पन्नापेक्षा जास्तीची मोठ्या प्रमाणातील रोख रक्कम शासनाचा कर बुडवून बेकायदेशीरपणे बाळगून हवालामार्फत विल्हेवाट लावत असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने दुपारी संगमनेरमध्ये छापा टाकला.

पथकाने ४२ लाख १५ हजार रुपयांच्या रोकड रकमेसह मुकेशकुमार रमेशभाई पटेल (वय ३६ वर्ष रा. पार्श्वनाथ गल्ली, जैन मंदिराजवळ, संगमनेर मूळ रा. विसनगर, जि. म्हैसाणा, गुजरात), धवलकुमार जसवंतभाई पटेल (वय ३२, रा. पार्श्वनाथ गल्ली, जैन मंदिराजवळ, संगमनेर मुळ रा. विसनगर, जि. म्हैसाणा, गुजरात) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी सदरची रक्कम हवाल्याची असून ती मालक भावेश रामाभाई पटेल (रा. पार्श्वनाथ गल्ली, संगमनेर) व आशिष सुभाष वर्मा (रा. संगमनेर) यांची असल्याचे सांगितले. याप्रकरणी उशिरापर्यंत पोलीस चौकशी तसेच शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,831
एलसीबी संगमनेर हवाला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.