Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गावठी पिस्तुलासह एकाला पकडले, पोलीस उप अधीक्षकांच्या पथकाची संगमनेरात कारवाई
गुन्हेगारी

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गावठी पिस्तुलासह एकाला पकडले, पोलीस उप अधीक्षकांच्या पथकाची संगमनेरात कारवाई

पथकात यांचा होता समावेश
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, २९ ऑक्टोंबर 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संगमनेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गावठी पिस्तूल विक्रीसाठी घेऊन आलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी गावठी पिस्तुलासह पकडले असून या कारवाईत ३१ लाखाहून अधिक रकमेचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

संबंधित आरोपी विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आशिष सुनीलदत्त महिरे (वय २८, मूळ रा. सातपूर, नाशिक हल्ली राहणार गोल्डन सिटी संगमनेर) असे पोलिसांनी कारवाईत अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी, संगमनेर शहरातील कुरणरोड भागात एक व्यक्ती गावठी पिस्तुलाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांना मिळाली होती. त्यांनी याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, पोलीस नाईक राहुल डोके यांना देत संबंधित ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

पथकाने माहिती मिळालेल्या परिसरात जाऊन शोध घेतला असता कुरण रोड परिसरातील आझादनगर गल्ली क्रमांक २ समोरून रस्त्यावर एक व्यक्ती त्याच्या ताब्यातील टोयाटो फॉर्च्यूनर गाडीसह (एम.एच. 15 एफ 9630) संशयास्पद स्थितीत आढळून आला.

पोलीस पथकाने संशयित व्यक्तीकडे विचारपूस केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. तसेच त्याचे नाव विचारले. संशयित आरोपी आशिष महिरे याची अंगजाठी तसेच गाडीची झटके घेतले असता ड्रायव्हरच्या सेट खाली सिल्वर रंगाचे लोखंडे धातूचे गावठी पिस्तूल मिळून आले. पथकाने या संदर्भात अधिक चौकशी केली असता महिरे याने अधिक रक्कम मिळाल्यास सदर पुस्तकाचे विक्री करणार असल्याचे पोलीस पथकाला सांगितले.

पथकाने आरोपीकडून ५० हजार रुपये किमतीचा सिल्वर रंगाची व त्यावर काळ्या रंगाची पट्टी असलेल्या आणि सोबत मॅक्झिन असलेल्या गावठी पिस्तूलसह २ आयफोन, तीस लाख रुपये किमतीचे सिल्वर रंगाची टोयाटो फोरचुनर गाडी, मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपअधीक्षक यांच्या कार्यालयातील पोलीस नाईक राहुल डोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,783
कल्पेश दाभाडे कारवाई गावठी पिस्तूल राहुल डोके राहुल सारबंदे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर…

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.