Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती रद्द करण्याची नागरिकांची मागणी

07/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026

आज सोमवार, ०७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

07/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अबब… निवडणुकीच्या आचारसंहिता भरारी पथकांच्या कारवाईत नाशिक परिक्षेत्रात सुमारे पन्नास कोटींचा मुद्देमाल जप्त – विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली माहिती
गुन्हेगारी

अबब… निवडणुकीच्या आचारसंहिता भरारी पथकांच्या कारवाईत नाशिक परिक्षेत्रात सुमारे पन्नास कोटींचा मुद्देमाल जप्त – विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली माहिती

गुजरात, मध्यप्रदेशच्या सीमेवर ३४ मिरर चेक नाके व ३८ तपासणी नाके उभारले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, १० नोव्हेंबर 

नाशिक – निवडणूक आचारसंहिता काळात नाशिक परिक्षेत्रामध्ये पोलिसांची २६४ भरारी पथके कार्यरत असून या पथकाच्या माध्यमातून आतापर्यंत ६ कोटी ५३ लाखांच्या रोकडसह एकूण ३४ कोटी रुपयांचे मौल्यवान दागिने व अन्य प्रलोभन वस्तू असा सुमारे ४९ कोटी ०७ लाखांचा एकूण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे, अशी माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी त्यांच्या ‘दक्षता’ कार्यालयात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता कालावधीत नाशिक परिक्षेत्रातील अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबारसह नाशिक जिल्ह्यांची पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, नाशिक परिक्षेत्रात विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पाचही जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांची बैठक घेत निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष आराखडा तयार केला आहे.

यानुसार पाचही जिल्ह्यांत चोख बंदोबस्त व सीमावर्ती भागात चार जिल्ह्यांना गुजरात व मध्य प्रदेश राज्यांची सीमा लागते. यामुळे कराळे यांनी या दोन्ही राज्यांच्या पोलिस महानिरीक्षक व अधीक्षकांसोबतही बैठक घेत ३४ मिरर चेक नाके व ३८ तपासणी नाके उभारले आहेत.

दरम्यान, ५२ अग्निशस्त्रे, ८९ काडतुसे, १५३ अन्य घातक शस्त्रे तसेच ५ कोटी ७५ लाख रुपयांची अवैध दारू, २ कोटी ६७ लाखांचा गांजा व अन्य अमली पदार्थ नाशिक परिक्षेत्रात जप्त करण्यात आले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे असलेल्या भारतीय सशस्त्र दलासाठीच्या गन पावडर व शस्त्रास्त्रे निर्मितीच्या कारखान्यांतून काही दिवसांपूर्वी शस्त्रगारातून तीन एके-४७ व ५.५६ च्या दोन अशा एकूण पाच रायफल्स चोरीला गेल्या हाेत्या. एटीएसच्या मदतीने पोलिसांनी त्या बंदुका जप्त केल्या असून, एकाला अटकदेखील करण्यात आली आहे, असेही कराळे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 620
दत्तात्रय कराळे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

राजापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती रद्द करण्याची नागरिकांची मागणी

By Annant Ppangarkar07/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: राजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत शाळा व्यवस्थापन…

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026

आज सोमवार, ०७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

07/09/2026

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

06/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.