Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पुन्हा एकदा ‘ट्रम्पेट’मुळे ९ जागांवर विरोधकांचा फायदा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत
राजकारण

पुन्हा एकदा ‘ट्रम्पेट’मुळे ९ जागांवर विरोधकांचा फायदा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/11/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार २६ नोव्हेंबर – मुंबई 

तुतारी आणि ट्रॅम्पेटच्या साधर्म्यामुळे पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. दोन्ही चिन्हातील गोंधळामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ उमेदवार पराभूत झाले असून या चिन्हाचा फायदा विरोधी उमेदवारांना झाला आहे.

९ जागांवर फटका – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात ८६ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी केवळ १० जागांवर त्यांना विजय मिळवता आला. तर ९ जागांवरील उमेदवार ‘ट्रम्पेट’मुळे पराभूत झाल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह दिले होते. लोकसभा निवडणुकीत ‘ट्रम्पेट’चे भाषांतर पिपाणी करण्यात आले होते. त्याचा दोन मतदारसंघांत पवार गटाला फटका बसला होता.

आयोगाने मागणी फेटाळली – दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा झालेला पराभव आणि ट्रम्पेटला मिळालेली मोठ्या प्रमाणातील मत लक्षात घेत पक्षाने ट्रम्पेट चिन्ह गोठवावे अशी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. मात्र निवडणूक आयोगाने पवार यांच्या पक्षाची ती मागणी फेटाळली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत हे चिन्ह कायम राहिले.

अपक्षांची ट्रम्पेटला पसंती – लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेट चिन्हाला मिळालेला प्रतिसाद पाहून विधानसभेला अनेक अपक्षांनी ट्रम्पेटची मागणी केली होती. तब्बल १६३ मतदारसंघांत ट्रम्पेट हे चिन्हे देण्यात आले होते. याचा फटका पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना बसल्याचे निवडणूक निकालानंतर समोर आले आहे.

‘ट्रम्पेट’मुळे माझा विजय – आंबेगाव मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील निवडून आले. वळसे पाटील यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आपल्याला ‘ट्रम्पेट’ चिन्हाने घेतलेल्या मतांचा लाभ झाल्याची कबुली दिली. शरद पवारांच्या देवदत्त निकम यांचा वळसे पाटलांनी १५२३ मतांनी पराभव केला तर या चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवाराला २९६५ मते मिळाली होती. त्यामुळे वळसे पाटलांचा विजय झाला.

ट्रॅम्पेटमुळे या मतदारसंघात पवारांच्या उमेदवारांना बसला फटका –

  • जिंतूर मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार विजय भांबळे यांचा ४५५४ मतांनी पराभव झाला. ट्रॅम्पेट चिन्हावर उभ्या असलेल्या विनोद भावळे यांना ७४३० मते मिळाली.
  • घनसावंगी मतदारसंघातील शरद पवार गटाच्या राजेश टोपेंचा पराभव २३०९ मतांनी झाला. ट्रॅम्पेट चिन्हाच्या उमेदवाराला ४८३० मते मिळाली.
  • शहापूरमध्ये राष्ट्रवादीच्या पांडुरंग बरोरा यांचा १६७२ मतांनी पराभव झाला.येथे ट्रॅम्पेट चिन्हाच्या उमेदवाराला ३८९२ मते मिळाली.
  • बेलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या संदीप नाईक यांचा ३७७ मतांनी पराभव झाला. तिथे ट्रॅम्पेट चिन्हावर उभ्या असलेल्या प्रफुल म्हात्रे यांना २८६० मते मिळाली.
  • अणुशक्तीनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाहद अहमद यांचा ३३७८ मतांनी पराभव झाला. येथे ट्रॅम्पेट चिन्हावर उभ्या असलेल्या जयप्रकाश अग्रवाल यांना ४०७५ मते मिळाली.
  • आंबेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीच्या देवदत्त निकम यांचा १५२३ मतांनी पराभव झाला. तिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे-पाटील हे निवडून आले आहेत. येथे देवदत्त शिवाजीराव निकम नावाच्या एका दुसऱ्या उमेदवाराला २९६५ मते मिळाली ज्याचे निवडणूक चिन्ह ट्रॅम्पेट होते.
  • पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर उभ्या असलेल्या राणी लंके यांचा १५२६ मतांनी पराभव झाला. तिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काशिनाथ दाते निवडून आले, तर ट्रॅम्पेट चिन्हावर उभ्या असलेल्या सखाराम सारक यांना ३५८२ मते मिळाली.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,081
ट्रम्पेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शरद पवार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या युनियन अध्यापक विद्यालयातून सन १९८४ ते १९८६ च्या वर्गातून बाहेर…

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.