Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पवारांवरील टीका पडळकर यांना भोवणार… भाजपने मागितले स्पष्टीकरण
राजकारण

पवारांवरील टीका पडळकर यांना भोवणार… भाजपने मागितले स्पष्टीकरण

पवारांवरील पडळकर यांनी केलेली टीका भाजपला मान्य नाही
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/12/2024Updated:11/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

बुधवार ११ डिसेंबर – भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नेहमी खालच्या पातळीवर टीका करतात. मंगळवारी पडळकर यांनी माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे जाऊन शरद पवार यांच्याबद्दल टीका करत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पडळकरांच्या विधानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आहे का? असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर भाजपने पडळकर यांना जाब विचारत स्पष्टीकरण मागितलं आहे.

पडळकर यांनी खालच्या पातळीवर टीका करताच राज्यभर त्यांचा आणि ज्या पक्षाचे ते आमदार आहेत त्या भाजपवर सर्वत्र जोरदार टीका होत होती. तरीही भाजपकडून याची अपेक्षित दखल घेतली जात नव्हती. मात्र शिवसेना नेत्यांनी याचा थेट जाब विचारत मुख्यमंत्री पडळकर यांच्या वक्तव्याशी सहमत आहेत काय असा सवाल करताच सूत्र फिरली आणि भाजप नेत्यांनी पडळकर यांचे कान खेचले.

या मुद्द्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पडळकरांना इशारा दिला आहे. शरद पवार यांच्यावर खालच्या पद्धतीची टीका करणे मान्य नाही, असं बावनकुळेंनी पडळकरांना सुनावलं आहे. “शंभर शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आला. शंभर गावे असताना मारकडवाडीला का पुढे करण्यात आले? त्यामुळे मी आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीला आलो. लोकशाही मजबूत करण्यासाठी होळकरांनचा सिंहांचा वाटा आहे. पवारांना लाथेने उधळून टाकण्यासाठी आलो आहे,” असं पडळकर म्हणाले होते.

पडळकरांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी, शरद पवारांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्राला कायम आदर आहे. देवेंद्र फडणवीस यांचे लोक अशा पद्धतीची भाषा वापरतात, धमक्या देतात. माझ्या पाठिंब्याने हे बोलतात, असं फडणवीसांनी स्पष्ट करावे, असं आव्हान संजय राऊतांनी दिलं. ही विचारणा करताच चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यावर भाष्य केलं आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. आमची वैचारिक भूमिका वेगळी आहे. मात्र, शरद पवारांना खालच्या पातळीवर जाऊन आणि व्यक्तीगत टीका करणे मान्य नाही. टीका करणाऱ्यांना आम्ही समज देऊ, असा इशारा बावनकुळेंनी पडळकरांना दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 983
गोपीचंद पडळकर चंद्रशेखर बावनकुळे भाजप शरद पवार संजय राऊत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
क्रिडा व कला

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar मुंबई/अहिल्यानगर: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (मध्यवर्ती), मुंबई यांच्या वतीने ‘अखिल भारतीय मराठी…

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.