Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित… संभाव्य मंत्र्यांची नावे आली समोर, संभाव्य यादीत राधाकृष्ण विखे यांचे नाव नाही; अहिल्यानगरमधून या आमदाराला मिळणार संधी!
राजकारण

महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित… संभाव्य मंत्र्यांची नावे आली समोर, संभाव्य यादीत राधाकृष्ण विखे यांचे नाव नाही; अहिल्यानगरमधून या आमदाराला मिळणार संधी!

मोठे यश मिळू नाही भाजपकडून अहिल्यानगर जिल्हा दुर्लक्षित
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/12/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार १३ डिसेंबर 

मुंबई – महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला निश्चित झाला असून यात भारतीय जनता पक्षाला २१, शिवसेनेला १३ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ९ मंत्रिपदे मिळणार आहे. नव्या मंत्रिमंडळात ४३ मंत्र्यांचा समावेश असेल. भारतीय जनता पक्षाकडून दिल्या जाणाऱ्या आणि समोर आलेल्या संभाव्य २१ मंत्र्यांच्या नावाच्या यादीत अहिल्यानगरचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांचा समावेश नसल्याचे दिसते. त्यामुळे त्यांच्याकडून आता मंत्रिपदासाठी फिल्डींग लावली जाण्याची चिन्हे निर्माण झाले आहे. भाजप आणि शिवसेनेकडून जिल्ह्याला मंत्रीपद मिळणार असल्याचे चिन्ह असून राष्ट्रवादी काँग्रेस कडून मात्र चेहऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. संभाव्य मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना कॅबिनेट व राज्यमंत्रीपद दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

महायुती सरकारमध्ये अद्यापही विविध खात्यांवरून ‘गृह’कलह सुरू असल्याची विश्वासनीय माहिती आहे. सोमवारी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होत असून या अधिवेशनाच्या अगोदर शनिवारी (१४ डिसेंबर) संध्याकाळपर्यंत संभाव्य मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे संकेत मिळत आहे.

पहिल्या टप्यात भाजपचे १७, शिवसेनेचे १० आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाला कोण कोणती खाती मिळणार हे ठरले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. खाते वाटपाचा तिढा सुटल्यामुळे महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुढच्या काही तासांत होण्याची शक्यता आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार – भारतीय जनता पक्षाकडे नगरविकास, गृह, सामान्य प्रशासन, ग्रामविकास, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, ओबीसी कल्याण ही खाती असणार आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वाटयाला महसूल, सार्वजनिक बांधकाम खात्यासह शालेय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, कामगार, राज्य उत्पादन शुल्क, परिवहन, पाणी पुरवठा आणि स्वच्छता ही खाती तर, राष्ट्रवादी अजित पवार गटाला वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, अन्न आणि नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, महिला आणि बालविकास, मदत आणि पुनर्वसन, अन्न आणि औषध प्रशासन ही खाती निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान सर्वच्या सर्व मंत्र्यांची नावे निश्चित करण्यात आली असल्याची माहिती आहे.

नव्या सरकारमध्ये भाजपकडून – चंद्रशेखर बाबनकुळे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, मंगलप्रभात लोढा, बबनराव लोणीकर, पंकजा मुंडे, आशिष शेलार किंवा योगेश सागर, संभाजी निलंगेकर, जयकुमार रावल, शिवेंद्रराजे भोसले, निलेश राणे, विजयकुमार गावित, देवयानी फरांदे किंवा राहुल आहेर, राहुल कुल, माधुरी मिसाळ, संजय कुटे, गोपीचंद पडळकर यांच्यापैकी २१ जणांना संधी मिळू शकते.

शिवसेना शिंदे गटातून दादा भुसे, उदय सामंत, शंभुराजे देसाई, गुलाबराव पाटील, मंगेश कुडाळकर, अर्जुन खोतकर, भरत गोगावले, संजय शिरसाट, राजेश क्षीरसागर, आशिष जैस्वाल, प्रताप सरनाईक, प्रकाश सुर्वे, योगेश कदम, बालाजी किणीकर, प्रकाश आबिटकर यांच्यापैकी १३ जणांना संधी मिळू शकते.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून – छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनजंय मुंडे, आदिती तटकरे, धर्मरावबाबा अत्राम, अनिल पाटील, माणिकराव कोकाटे, दत्ता भरणे, इंद्रनील नाईक, संग्राम जगताप, सुनील शेळके यांच्यापैकी ९ जणांना संधी मिळू शकते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,779
अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राधाकृष्ण विखे संग्राम जगताप
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
क्रिडा व कला

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar मुंबई/अहिल्यानगर: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (मध्यवर्ती), मुंबई यांच्या वतीने ‘अखिल भारतीय मराठी…

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.