गुरुवार, २ जानेवारी
संगमनेर – विविध योजनांसाठी दिले जाणारे अनुदान रखरविण्यात आल्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गेल्या आठवड्यात २३ डिसेंबरला हे अनुदान तातडीने देत प्रलंबित प्रकरणे मार्गे लावण्याच्या केलेल्या मागणीनंतर बुधवारी नववर्षाच्या प्रारंभी विविध योजनांचे सुमारे सहा कोटी रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली यशोधन कार्यालयाच्या माध्यमातूlन संगमनेर तालुक्यातील विविध गाव वस्त्यांवरील पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला जातो. थोरात यांनी आपल्या लोकप्रतिनिधित्वाच्या काळात तालुक्यातील प्रत्येक गावात वाडी वस्तीवर विकासाच्या योजना राबविल्या.
मागील अनेक दिवसांपासून संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना यामधील अनेक लाभार्थ्यांचे अनुदान राजकीय हेतू ठेवून जाणीवपूर्वक रखडवले गेले होते. याबाबत थोरात यांनी वेळोवेळी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. यानंतर प्रशासनाने अनुदान देण्याचे मान्य केले. परंतु दिवाळीनंतर हे अनुदान मुद्दाम रखडून ठेवल्याने काँग्रेस शिष्टमंडळाने संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली २३ डिसेंबर २०२४ रोजी प्रांताधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन सर्व प्रकरणे तातडीने मार्गी लावावी तसेच लाभार्थ्यांना त्यांचे अनुदान द्यावे, अशी आग्रही मागणी केली. याचबरोबर हे अनुदान तातडीने जमा न झाल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
या मागणीची प्रशासनाने दखल घेऊन संजय गांधी निराधार योजनेच्या ६२८० लाभार्थ्यांना २,६१,७४,०००/- रुपये, श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत ५६७६ लाभार्थ्यांना १,६५,७२,०००/- रुपये, तर श्रावण बाळ गट निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत ४४३९ लाभार्थ्यांना १,१३,०५,०००/- रुपये, याचबरोबर अनुसूचित जाती जमातीमधील १८७९ लाभार्थ्यांना २०,१३,०००/- रुपये असे एकूण ५ कोटी ९६ लाख रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग होत आहे.


