Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भाजप ओबीसी सेलच्या जिल्हा उपाध्यक्षाला मारहाण… आमदार खताळ समर्थक भाजपच्याच दोन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
गुन्हेगारी

भाजप ओबीसी सेलच्या जिल्हा उपाध्यक्षाला मारहाण… आमदार खताळ समर्थक भाजपच्याच दोन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

मारहाणीत जखमी झालेल्या भगत यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आमदार खताळ समर्थक असलेल्या सुयोग गुंजाळ आणि राहुल भोईर या दोघांविरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/01/2025Updated:05/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान संगमनेर मार्गे त्रंबकेश्वरकडे जात असताना येथील शासकीय विश्रामगृहावर थांबले होते. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले. चौहान यांच्या दौऱ्यादरम्यान भारतीय जनता पक्षाचे ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक भगत यांना आमदार समर्थक असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्याचा प्रकार समोर आला होता.

मारहाणीत जखमी झालेल्या भगत यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आमदार खताळ समर्थक असलेल्या सुयोग गुंजाळ आणि राहुल भोईर या दोघांविरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान आणि संगमनेरचे आमदार अमोल खताळ हे शासकीय विश्रामगहावर उपस्थित असताना भाजपच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला खताळ समर्थकांनी धक्काबुक्की व मारहाण केल्याचे प्रकरण समाज माध्यमातून समोर आल्यानंतर त्याचे वेगवेगळे पडसाद उमटले. मारहाण करणारे आणि मारहाण झालेल्या पदाधिकाऱ्याविषयी शहरात चर्चा सुरू होती. अखेरीस रुग्णालयात उपचार घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक भगत यांनी केलेल्या तक्रारीनंतर मारहाण झालेल्या आणि मारहाण करणाऱ्यांची नावे समोर आले आहे. या प्रकारामुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी देखील उफाळून आली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे व माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे समर्थक असलेल्या भाजपच्या अमोल खताळ यांना विधानसभा निवडणुकीत अचानकपणे शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली होती. भाजपचाच कार्यकर्ता शिवसेनेकडून आमदार झाल्याने भाजपमधील काही पदाधिकारी, कार्यकर्ते आमदार खताळ यांच्यासोबत असल्याने पक्षात गटबाजी निर्माण झाली आहे. त्याची परिणती मागील काही दिवसात सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या पोस्टवरून भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकारी असलेल्या भगत यांना विश्रामगृहात आणि बाहेर धक्काबुक्की शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. या मारहाणीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर अशी कुठलीच घटना घडली नसल्याचा निर्वाळा काही मंडळींनी परस्पर दिला.

मात्र भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकारी आणि पक्षाकडून या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली. यातूनच भाजपचे संघटन मंत्री असलेले रवी अनासपुरे यांनी देखील रुग्णालयात जाऊन भगत यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. आता मात्र या संदर्भात भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी असलेल्या दीपक भगत यांच्या जबाबावरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

भगत हे केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या स्वागतासाठी विश्रामगृहावर गेले असता ही घटना झाली आहे. मंत्री चौहान विश्रामगृहात असताना विश्रामगृहाच्या पायऱ्या उतरत असताना सुयोग गुंजाळ आणि राहुल भोईर या दोघांनी त्यांना धक्का दिला. त्यावरून त्यांनी धक्का देऊ नका, माझी तब्येत बरी नाही असे त्यांना सांगितले. त्यानंतर चौहान त्र्यंबकेश्वरकडे जाण्यासाठी रवाना झाले. त्यानंतर विश्रामगृहाच्या बाहेरच असलेली मोटरसायकल घेत असताना पुन्हा या दोघांनी दीपक भगत यांना खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

त्यामुळे भगत यांना त्रास झाला. तसेच त्यानंतर दुसऱ्या दिवशी भगत यांना अधिकच त्रास होऊ लागल्याने ते येथील खाजगी रुग्णालयात देखील दाखल झाले आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबावरून सुयोग गुंजाळ आणि राहुल भोईर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 2,965
अमोल खताळ दीपक भगत भाजप मारहाण राहुल भोईर सुयोग गुंजाळ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या रस्त्याच्या विकासाला अखेर मोठा वेग…

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.