Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हाकला, सर्वपक्षीय नेत्यांची राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडे मागणी
राजकारण

धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हाकला, सर्वपक्षीय नेत्यांची राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडे मागणी

धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची गरज आहे. यापूर्वी ए. आर. अंतुले, मनोहर जोशी, अशोक चव्हाण, आर. आर. पाटील अशा विविध नेत्यांनी लोकांचा आक्रोश पाहून राजीनामा दिला होता.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. देशमुख यांची निर्घृण हत्या आणि सुरू असलेल्या खंडणीखोरीच्या कारवायांमुळे बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात राहिलेली नाही, असा आरोप शिष्टमंडळाने केलाय. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा, अशी प्रमुख मागणी यावेळी शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केलीय.

माजी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना भेटलेल्या या सर्वपक्षीय शिष्टमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर, ज्योती मेटे यांचा समावेश होता.

या प्रकरणात पक्षपातीपणा होत असल्याचा संशय असल्याने आणि आरोपींना राज्य सरकारकडून कथित पाठिंबा मिळत असल्याने नागरिकांचा विश्वास उडाला आहे. यामुळे राज्यपालांनी तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात आली.

कायद्याचे राज्य ही भावना दृढ होण्यासाठी अपहरण, खंडणी आणि खून प्रकरणाचा सूत्रधार वाल्मीक कराड यांच्याविरुद्ध बीएनएस १०३ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करून खटला जलदगती न्यायालयात चालवावा. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कर्तव्यात कुचराई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. बीड मधील रहिवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करावी आणि खंडणी व गुंडगिरीला आळा घालण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा मागण्या शिष्टमंडळाने केल्या आहे.

राज्यपालांना भेटल्यानंतर संभाजीराजे म्हणाले, ही माणुसकीची हत्या आहे. त्यामुळे या प्रकरणात जातीच्या पलिकडे जाऊन देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. मराठा-वंजारी असा वाद करण्याची गरज नाही. आम्ही या प्रकरणात राज्यपालांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली. राज्यपालांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिल. पुरोगामी महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचा विचार जिवंत ठेवण्यासाठी जातीपातीच्या पुढे जाण्याची गरज आहे.

धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची गरज आहे. यापूर्वी ए. आर. अंतुले, मनोहर जोशी, अशोक चव्हाण, आर. आर. पाटील अशा विविध नेत्यांनी लोकांचा आक्रोश पाहून राजीनामा दिला होता. आता धनंजय मुंडेंना सरकार, अजित पवार का संरक्षण देत आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारलाय.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बीडमध्ये यापूर्वी झालेल्या प्रकरणांचा तपास होण्याची गरज व्यक्त केलीय. मराठा वंजारी हा वाद करू नये. सरकारने मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न करू नये. चौकशी अधिकाऱ्यांचे आरोपी सोबत संबंध आहे त्यांचे इंटरेस्ट आहे त्यामुळे या प्रकरणातील चौकशी अधिकारी तात्काळ बदलावी अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 544
जितेंद्र आव्हाड धनंजय मुंडे बीड हत्याकांड राधाकृष्णन विजय वडेट्टीवार सुभाष देशमुख
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.