Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन, शहर व तालुक्यातील अनाधिकृत फ्लेक्स तातडीने काढा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन… माजी शहर प्रमुख अमर कतारी यांचा इशारा
महाराष्ट्र संवाद विशेष

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन, शहर व तालुक्यातील अनाधिकृत फ्लेक्स तातडीने काढा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन… माजी शहर प्रमुख अमर कतारी यांचा इशारा

इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बस स्थानक या मुख्य रस्त्यावर एका विशिष्ट पदाधिकाऱ्याचे अनाधिकृत फ्लेक्स आहेत. इतके दिवस फ्लेक्स कसे राहू शकतात असा प्रश्न उपस्थित करत फ्लेक्स संदर्भातील नियम सर्वांना सारखा आहे का आणि याचे शुल्क भरलेले आहेत का? हाही खुलासा होणे गरजेचे आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – संगमनेर शहर व तालुक्यात विशिष्ट राजकीय पक्षांचे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे फ्लेक्स हे अनाधिकृत व अधिकृत वेळेच्या मर्यादेपेक्षा जास्त वेळ ठेवले गेले आहेत. प्रशासनाकडून याबाबत दुर्लक्ष होणे हे अत्यंत चुकीचे असून संगमनेर शहरामध्ये मुख्याधिकारी व तालुक्यामध्ये पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी तातडीने सूचना देऊन हे सर्व फ्लेक्स त्वरित काढावेत अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा खणखणीत इशारा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी दिला आहे.

कतारी यांनी म्हटले आहे की, निवडणुका झाल्यानंतर अनेक दिवसांपासून काही पक्षांच्या व त्यांच्या कार्यकर्त्यांचे फ्लेक्स संगमनेर बस स्थानक परिसर व संपूर्ण शहरांमध्ये आहे. याला कोणतीही परवानगी नाही. किंवा परवानगीच्या मुदती संपून गेलेल्या आहेत. मात्र प्रशासनाने त्यावर अद्याप कोणतेही कारवाई केलेली नाही.

याचप्रमाणे तालुक्यातील अनेक गावांमध्ये सर्व फ्लेक्स अनाधिकृत व वेळेच्या मर्यादा पेक्षा जास्त काळ ठेवलेले आहेत. या वेळेच्या मर्यादा व त्या शुल्काबाबतची जबाबदारी ही संबंधित ग्रामसेवकांची आहे मात्र ग्रामसेवक याकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे या फ्लेक्सची दुरावस्था होऊन सामाजिक मतभेद वाढू शकतात. अनेक दिवसांचे फ्लेक्स असल्याने काही ठिकाणी फाटले आहेत किंवा काही खराब झाले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण सुद्धा अस्थिर होऊन वाद निर्माण होतील.

इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बस स्थानक या मुख्य रस्त्यावर एका विशिष्ट पदाधिकाऱ्याचे अनाधिकृत फ्लेक्स आहेत. इतके दिवस फ्लेक्स कसे राहू शकतात असा प्रश्न उपस्थित करत फ्लेक्स संदर्भातील नियम सर्वांना सारखा आहे का आणि याचे शुल्क भरलेले आहेत का? हाही खुलासा होणे गरजेचे आहे

तरी तातडीने महामार्गावरील सर्व अनाधिकृत फ्लेक्स, बस स्थानकाजवळ असलेले फ्लेक्स तसेच अनेक गावांमध्ये खूप दिवसांपासून लावले गेलेले फ्लेक्स हे दोन दिवसांमध्ये तातडीने काढण्यात यावे अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने भव्य आंदोलन करण्यात येईल .

याचबरोबर या अस्थिर होणाऱ्या परिस्थितीला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, महामार्गाचे अधिकारी त्याचप्रमाणे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जबाबदार असतील. तरी त्यांनी तातडीने गावांमधील ग्रामसेवक व शहरातील संबंधित अधिकाऱ्यांमार्फत हे अनाधिकृत फ्लेक्स त्वरित काढले पाहिजेत असेही त्यांनी म्हटले आहे

गावागावातूनही अनाधिकृत फ्लेक्स हटवण्याची मागणी…

अनेक गावांमधून अनाधिकृत फ्लेक्स हे वेळेच्या पेक्षा जास्त दिवस लावले गेले आहेत. याबाबत ग्रामपंचायतमधून ग्रामसेवकांनी अत्यंत दुर्लक्ष केलेले दिसते. काही गावांमध्ये फ्लेक्स फाटले असल्याने येणाऱ्या काही दिवसांमध्ये गावातील कार्यकर्त्यांमध्ये भांडणे होऊ शकतात. यामुळे सर्व ग्रामसेवकांनी तातडीने फ्लेक्स काढले पाहिजे, अशी मागणी जेष्ठ नागरिक पंढरीनाथ गुंजाळ, बाबुराव दिघे, तात्या पाटील राहणे, राजु खरात आदींसह शहरातील व्यापाऱ्यांनी केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,372
अनधिकृत फ्लेक्स अमर कतारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: संगमनेर शहराजवळील कोल्हार-घोटी रस्त्यावरील समनापूर फ्लॉवर मार्केट चौफुली येथील…

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.