Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात जयंती निमित्त लायन्स क्लबच्यावतीने तीन दिवसांचे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर
सामाजिक

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात जयंती निमित्त लायन्स क्लबच्यावतीने तीन दिवसांचे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर

११, १२ व १३ जानेवारी २०२५ रोजी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख डॉ. सुचित गांधी व डॉ. प्रवीण पानसरे, लायन्स क्लबच्या अध्यक्षा राखी करवा यांनी दिली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती महोत्सवानिमित्त संगमनेरमध्ये स्व. डॉ. शरदकुमार दीक्षित (अमेरिका) यांच्या स्मरणार्थ लायन्स क्लब ऑफ संगमनेरच्यावतीने ११, १२ व १३ जानेवारी २०२५ रोजी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख डॉ. सुचित गांधी व डॉ. प्रवीण पानसरे, लायन्स क्लबच्या अध्यक्षा राखी करवा यांनी दिली आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारातून संगमनेर तालुक्यात समृद्धी निर्माण केली आर्थिक शिस्त विकासाची परंपरा घेऊन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्याला वैभवशाली बनवले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी संगमनेरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन होते.

यावर्षी ही जयंती व डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ लायन्स क्लब ऑफ संगमनेर व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसांचे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर डॉ. प्रवीण पानसरे यांच्या धन्वंतरी हॉस्पिटल येथे होणार आहे.

या मोफत प्लास्टिक शिबिर सर्जरीमध्ये दुभगलेले ओठ व टाळू, नाक व कान यावरील बाह्य विकृती तसेच जन्मत: फाटलेले ओठ व टाळूंच्या शस्त्रक्रिया, छोटे कान, तिरपे नाक, तिरपी हनुवटी इत्यादीसाठी मोफत तपासणी व शस्त्रक्रिया होणार आहे.

या शस्त्रक्रियांसाठी डॉ. शरद कुमार दीक्षित यांच्या समवेत काम केलेले अमेरिकेतील त्यांचे सहकारी डॉ. लेरी व्हेन स्टेन, डॉ. बैरी सिट्रोन, डॉ. लेडीज ब्रेन, डॉ. लिंडा पीटरसन व त्यांचे सहकारी येणार आहे.

अमेरिकेहून संगमनेरमध्ये येऊन अनेक डॉक्टर रुग्णांची मोफत सेवा करणार असून या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन लायन्स क्लबचे अध्यक्ष राखी करवा, सचिव डॉ. अबोली गांधी, खजिनदार ला. श्वेता जाजू, श्रीनिवास पगडाल, डॉ. सुचित गांधी, डॉ. प्रवीणकुमार पानसरे, डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह विविध मान्यवरांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 485
जयंती महोत्सव डॉ. सुचित गांधी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला एक नवी…

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.