Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पतंगीचा मांजाने दुचाकीवरील दोघे जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक; दोन दिवसानंतरही गुन्हा दाखल नाही
महाराष्ट्र संवाद विशेष

पतंगीचा मांजाने दुचाकीवरील दोघे जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक; दोन दिवसानंतरही गुन्हा दाखल नाही

आर्थिक मदतीची आवाहन...
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/01/2025Updated:18/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – दुचाकीवरून नाशिक पुणे मार्गाने संगमनेरकडे येणारे दोघेजण रस्त्यात आडव्या असलेल्या पतंगीच्या मांज्याला अडकून जखमी झाले आहे. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असून दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. जखमींवर संगमनेर मधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान शुक्रवारी दुपारी घडलेल्या या घटने संदर्भात शनिवारी सायंकाळपर्यंत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.अनिकेत संजय कटारनवरे (वय २२ वर्ष रा. सिन्नर, जि. नाशिक) व प्रफुल्ल घुसळे (वय २८ वर्ष रा. संगमनेर) अशी दोघा जखमींची नावे असून अनिकेत कटारनवरे याची प्रकृती चिंताजनक असून मांजामुळे त्याच्या गळ्याला मोठी जखम झाली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
शुक्रवारी सायंकाळी नासिक-पुणे महामार्गावर संगमनेरच्या बाह्यवळण रस्त्यावर कृष्णा लॉन्ससमोर ही घटना घडली. दरम्यान या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात संपर्क साधला असता शनिवारी सायंकाळपर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. लाईट नसल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यास विलंब होत असल्याची माहिती महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी दिली.
अनिकेत कटारनवरे व प्रफुल्ल घुसळे हे दोघेजण शुक्रवारी सायंकाळी दुचाकीवरून संगमनेरकडे येत असताना महामार्गावर ही दुर्घटना घडली. अनिकेत कटारनवरे याच्या गळ्याला श्वासनलिकेजवळ मोठ्या प्रमाणात इजा झाल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. अनिकेत हा विखे पाटील फाऊंडेशनच्या अहिल्यानगर येथील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.
या संदर्भात अनिकेतचे वडील संजय कटारनवरे म्हणाले, मुलाला गंभीर जखम झाली असून आत्तापर्यंत प्रशासनातील कोणीही अधिकारी कर्मचारी रुग्णालयाकडे फिरकले नसून आमची साधी चौकशी देखील करण्यात आली नाही. यासंदर्भात पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी आम्हाला आरोपीचा शोध घेण्यास सांगितले. आमची परिस्थिती अतिशय हलाखीची असून उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. दात्यांनी ९८५०७४९०१२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,431
दुर्घटना मांजा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.