Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मोठी बातमी! पालकमंत्र्यांची यादी जाहीर, धनंजय मुंडे, भरत गोगावलेना डच्चू, राधाकृष्ण विखे यांना मिळाला हा जिल्हा; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह या मंत्र्याकडे दोन-दोन जिल्हे
राजकारण

मोठी बातमी! पालकमंत्र्यांची यादी जाहीर, धनंजय मुंडे, भरत गोगावलेना डच्चू, राधाकृष्ण विखे यांना मिळाला हा जिल्हा; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह या मंत्र्याकडे दोन-दोन जिल्हे

अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई – दीर्घकाळ रखडलेली पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यास राज्य सरकारला अखेर मुहूर्त लाभला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि मुंबई शहराचे तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बहुचर्चित असलेल्या बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे. याशिवाय चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नागपूर व अमरावती या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री पद असेल.
नव्याने जाहीर करण्यात आलेल्या पालकमंत्र्यांमध्ये वादग्रस्त ठरलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह बहुचर्चित असलेल्या भरत गोगावले, योगेश कदम आणि इतर तिघा मंत्र्यांना डच्चू देण्यात आला असून अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. याशिवाय काही जिल्ह्यांना सह पालकमंत्री देण्यात आले आहे. राज्य सरकारकडून शनिवारी रात्री यादी जाहीर करण्यात आल्याने आता पालकमंत्री त्या-त्या जिल्ह्यात येत्या २६ जानेवारीला ध्वजारोहण करतील.
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या बीडचे पालकमंत्री पद पंकजा मुंडे किंवा धनंजय मुंडे यांच्यापैकी कोणाला मिळेल याची चर्चा सुरू होती. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांच्याकडे पालकमंत्री पद देऊ नये, अशी मागणी केली जात होती. अखेरीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यासह बीडचे पालकमंत्री पद स्वतःकडे ठेवले आहे.
तर दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहराची जबाबदारी सोपविण्यात आली असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद असणार आहे. तर पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकमंत्री असणार आहेत. धुळ्याचं पालकमंत्रिपद जयकुमार रावल यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.  वाशिमची जबाबदारी हसन मुश्रीफ यांना देण्यात आली आहे. संजय राठोड हे यवतमाळचे पालकमंत्री असणार आहेत. उदय सामंत हे रत्नागिरीचे पालकमंत्री असणार आहेत.

बघा कोणाकडे कोणत्या जिल्ह्याची जबाबदारी…
गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
नागपूर व अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
ठाणे व मुंबई शहर – एकनाथ शिंदे
पुणे व बीड – अजित पवार
अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील
वाशिम – हसन मुश्रीफ
सांगली – चंद्रकांत पाटील
सातारा – शंभुराजे देसाई
छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट
जळगाव – गुलाबराव पाटील
यवतमाळ – संजय राठोड
कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ
अकोला – आकाश फुंडकर
भंडारा – संजय सावकारे
बुलढाणा – मकरंद जाधव
चंद्रपूर – अशोक ऊईके
धाराशीव – प्रताप सरनाईक
धुळे – जयकुमार रावल
गोंदिया – बाबासाहेब पाटील
हिंगोली – नरहरी झिरवळ
लातूर – शिवेंद्रसिंग भोसले
मुंबई उपनगर -आशिष शेलार/ सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
नांदेड – अतुल सावे
नंदुरबार – माणिकराव कोकाटे
नाशिक – गिरीष महाजन
पालघर – गणेश नाईक
परभणी – मेघना बोर्डीकर
रायगड – अदिती तटकरे
सिंधुदुर्ग- नितेश राणे
रत्नागिरी – उदय सामंत
सोलापूर – जयकुमार गोरे
वर्धा – पंकज भोयर
जालना – पंकजा मुंडे

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,791
पालकमंत्री
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar06/09/20260

आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी प्राप्त…

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.