Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पालकमंत्री पदावरून महायुती सरकारमध्ये मतभेद… महाजन-तटकरेंना धक्का, पालकमंत्री पदाला स्थगिती
राजकारण

पालकमंत्री पदावरून महायुती सरकारमध्ये मतभेद… महाजन-तटकरेंना धक्का, पालकमंत्री पदाला स्थगिती

पालकमंत्रिपदावरुन रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत वाद असून नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. त्यातच काही मंत्र्यांना पालकमंत्री पदावरून डच्चू देण्यात आल्याने महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/01/2025Updated:20/01/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई – महायुती सरकार मध्ये पालकमंत्री पदावरून सुरू असलेले मतभेद समोर आले आहे. महायुतीच्या सरकारमधील पालकमंत्रिपदाचं वाटप करण्यात आले. यामध्ये अनेक मंत्र्यांना पालकमंत्रिपदापासून वगळण्यात आल, त्यावरून मंत्र्यांमध्ये नाराजी उफाळून आली आहे. पालकमंत्रीपदावरून रायगडमध्ये मोठा राडा देखील झाला. या गोंधळानंतर महाराष्ट्रात रातोरात मोठ्या राजकीय हालचाली पहायला मिळाल्या असून १९ जानेवारीला रात्री उशीरा नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

पालकमंत्रिपदावरुन रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत वाद असून नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. त्यातच काही मंत्र्यांना पालकमंत्री पदावरून डच्चू देण्यात आल्याने महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीत एकमत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे नाशिक आणि रायगडमधील पालकमंत्र्यांची निवड रद्द करण्यात आली आहे. याबाबत शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदी अदिती तटकरे आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती.

पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली तेव्हा रायगडचं पालकमंत्रिपद राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे, तर नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपच्या गिरीश महाजन यांना देण्यात आलं होतं. अदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी निवड होताच शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी नाराजी दर्शवली होती. तर नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची निवड झाल्याने शिवसेना शिंदे गटाच्या दादा भुसे यांच्या समर्थकांनी नाराजी दर्शवली.

त्यामुळे महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आला. त्यानंतर राज्य सरकारने शासन निर्णय जाहीर करत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस स्थगिती दिली.

पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी 

1. गडचिरोली – देवेंद्र फडणवीस

2. ठाणे – एकनाथ शिंदे 

3. मुंबई शहर – एकनाथ शिंदे 

4. पुणे – अजित पवार 

5. बीड – अजित पवार 

6. नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे 

7. अमरावती चंद्रशेखर बावनकुळे

8. अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील

9. वाशिम – हसन मुश्रीफ

10. सांगली – चंद्रकांत पाटील

11. नाशिक – गिरीश महाजन (स्थगिती देण्यात आली)

12. पालघर – गणेश नाईक

13. जळगाव -गुलाबराव पाटील

14. यवतमाळ – संजय राठोड

15. मुंबई उपनगर – आशिष शेलार तर सहपालकमंत्री – मंगलप्रभात लोढा 

16. रत्नागिरी – उदय सामंत 

17. धुळे – जयकुमार रावल

18. जालना – पंकजा मुंडे

19. नांदेड – अतुल सावे

20. चंद्रपूर – अशोक उईके 

21. सातारा – शंभूराज देसाई

22. रायगड – आदिती तटकरे (स्थगिती देण्यात आली)

23. लातूर – शिवेंद्रराजे भोसले 

24. नंदूरबार – माणिकराव कोकाटे

25. सोलापूर – जयकुमार गोरे

26. हिंगोली – नरहरी झिरवाळ

27. भंडारा – संजय सावकारे

28. छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट

29. धाराशिव – प्रताप सरनाईक

30. बुलढाणा – मकरंद जाधव

31. सिंधुदुर्ग – नितेश राणे 

32. अकोला – आकाश फुंडकर 

33. गोंदिया -बाबासाहेब पाटील 

34. कोल्हापूर – प्रकाश आबिटकर तर सह पालकमंत्री – माधुरी मिसाळ

35. वर्धा – पंकज भोयर 

36. परभणी – मेघना बोर्डिकर

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 10,690
आदिती तटकरे गिरीश महाजन पालकमंत्री
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर…

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.