Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती रद्द करण्याची नागरिकांची मागणी

07/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026

आज सोमवार, ०७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

07/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एसएमबीटी हॉस्पिटलच्यावतीने आयोजित शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्त महाआरोग्य शिबिर
आरोग्य

एसएमबीटी हॉस्पिटलच्यावतीने आयोजित शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्त महाआरोग्य शिबिर

मोफत आणि परवडणाऱ्या आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या एसएमबीटी हॉस्पिटलचा नावलौकिक महाराष्ट्रभरात आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक रुग्ण याठिकाणी उपचारासाठी दाखल होत आहेत. आपल्या शहरातील नागरिकांनादेखील मोफत उपचारांचा लाभ मिळावा या उदात्त हेतून अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/01/2025Updated:20/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्त एसएमबीटी हॉस्पिटलच्यावतीने सोमवारी शहरातील प्रभाग १ मधील पी.जे. आंबरे पाटील कन्या विद्यालयात महाआरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास शहरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या शिबिरात मोफत उपचार घेण्यासाठी सकाळपासून अनेक रुग्णांनी गर्दी केली. अनेक रुग्णांवर शिबिरस्थळी उपचार करण्यात आले तर पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांवर इगतपुरी तालुक्यातील नंदी हिल्स येथील एसएमबीटी हॉस्पिटल येथे उपचारांसाठी नेण्याचा सल्ला तज्ञांकडून देण्यात आला.

अधिक माहिती अशी की, शहरातील नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी दर रविवारी विविध प्रभागात या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. १० पेक्षा अधिक प्रभागांमधील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली.

या शिबिरास काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजीमंत्री बाळासाहेब थोरात, जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या शिबिरास भेट दिली.

शिबिरात जन्मजात हृदयविकार, हृदयविकार शस्रक्रिया, प्रतिबंधात्मक कर्करोग, मूत्रविकार, किडनी व डायलिसीस, जनरल शस्रक्रिया, अस्थिरोग, सांधेदुखी, पोटदुखी, हाडांचे आजार स्त्रियांचे आजार, नेत्ररोग तपासणी व उपचार तसेच आयुर्वेद हॉस्पिटलच्या वतीनेदेखील विविध आजारांवरील रुग्णांची तपासणी करण्यात आली.

याप्रसंगी एसएमबीटी सेवाभावी संस्थेचे बोर्ड मेंबर श्रीराम कुऱ्हे, अधिष्ठाता डॉ. मीनल मोहगावकर, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सचिन बोरसे यांच्यासह अनेक वरिष्ठ तज्ञांची उपस्थिती होती.

शिबिराच्या मुख्य समन्वयक म्हणून डॉ अश्विनी देशमुख यांनी काम पहिले. एसएमबीटी दंत महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. 

एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून गोरगरिबांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती शताब्दीच्या निमित्ताने संगमनेर शहर आणि तालुक्यात विविध ठिकाणी हे महाआरोग्य शिबिर होत आहे. यामध्ये विविध आजारांचे निदान व त्यावर उपचार होणार असल्याने या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. बाळासाहेब थोरात, माजी मंत्री

तालुक्यातील गोरगरीब ऊसतोड कामगार सर्वसामान्य नागरिक यांच्या आरोग्य सुविधांसाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दूरदृष्टीतून एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टची स्थापना केली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली एसएमबीटी हॉस्पिटलच्या माध्यमातून सातत्याने आदिवासी गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत व माफक दरात उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. –  डॉ. सुधीर तांबे 

मोफत आणि परवडणाऱ्या आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या एसएमबीटी हॉस्पिटलचा नावलौकिक महाराष्ट्रभरात आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक रुग्ण याठिकाणी उपचारासाठी दाखल होत आहेत. आपल्या शहरातील नागरिकांनादेखील मोफत उपचारांचा लाभ मिळावा या उदात्त हेतून अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 7,941
एसएमबीटी एसएमबीटी हॉस्पिटल बाळासाहेब थोरात सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

राजापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती रद्द करण्याची नागरिकांची मागणी

By Annant Ppangarkar07/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: राजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत शाळा व्यवस्थापन…

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026

आज सोमवार, ०७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

07/09/2026

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

06/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.