Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये सुरू असलेल्या बिजनेस एक्स्पोसमोर तरुणाकडून गोळीबार?
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये सुरू असलेल्या बिजनेस एक्स्पोसमोर तरुणाकडून गोळीबार?

भर गर्दीत गोळीबाराचा हा प्रकार घडल्याने याची शहरात मोठी चर्चा सुरू आहे. समाज माध्यमावर देखील या संदर्भात चर्चा सुरू असल्याने संगमनेर पोलिसांनी वेळीच यासंदर्भात वस्तुस्थिती समोर आणण्याची मागणी होत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/01/2025Updated:22/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – 

१६ जानेवारीपासून मोठ्या गर्दीत सुरू असलेल्या लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरच्या बिझनेस एक्स्पोसमोर सोमवारी रात्री एका तरुणाकडून गोळीबार करण्यात आला असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मोठ्या गर्दीत हा प्रकार घडल्याने मोठा अनर्थ निर्माण झाला असता. त्यामुळे गोळीबार करणारा हा तरुण कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

प्रश्नचिन्ह झाले निर्माण…

दरम्यान या संदर्भात पोलिसांनी असा प्रकार घडला नसल्याचे म्हटले आहे. हजारो लोकांसमोर घडलेला हा प्रकार नेमका काय होता असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.

एक्स्पोसमोर गर्दीत घडला प्रकार…

शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या मालपाणी लॉन्सवर गेल्या काही दिवसापासून लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरचा बिझनेस एक्स्पो मोठ्या गर्दीत सुरू आहे. त्यातच रस्त्यावरील फुटपाथ वर एक्स्पोचे स्टॉल मांडण्यात आले आहे आणि त्यापुढे भर रस्त्यात दुचाकीची पार्किंग असल्याने दुपारपासून हा रस्ता रात्री उशिरापर्यंत वाहतुकीच्या कोंडीत सापडलेला असतो.

पोलिसांनी वस्तुस्थिती समोर आणावी…

अशातच हा प्रकार घडल्याने याची शहरात मोठी चर्चा सुरू आहे. समाज माध्यमावर देखील या संदर्भात चर्चा सुरू असल्याने संगमनेर पोलिसांनी वेळीच यासंदर्भात वस्तुस्थिती समोर आणण्याची मागणी होत आहे.

नेमकं काय घडलं…

बिझनेस एक्स्पोसमोर सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याची सुमारास दोन गट एकमेकांसमोर आले होते. त्यांच्या बाचाबाची होऊन शिवीगाळ झाल्याने हा वाद टोकाला गेला होता. यातच एका तरुणाने आपल्या जवळील गावठी कट्ट्यातून रस्त्यावर गोळीबार केल्याने लोक सैरावैरा पळू लागले होते. मात्र याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त होत असल्याचे वृत्त दैनिक ‘सार्वमत’ने दिले आहे.

लवकरच तरुणाला ताब्यात घेणार…

दरम्यान संबंधित तरुणाने गावठी बंदूक नव्हे तर लाइटर काढले होते. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो तिथून पसार झाला. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांना पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. याशिवाय आणखी काही तरुणांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. संबंधित तरुणाला लवकरच ताब्यात घेण्यात येईल. – रवींद्र देशमुख पोलीस निरीक्षक संगमनेर शहर पोलीस ठाणे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 4,465
गोळीबार बिझनेस एक्स्पो संगमनेर पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.