Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अनधिकृत फ्लेक्स काढा अन्यथा फ्लेक्स फाडो आंदोलन करणार – अमर कतारी
सामाजिक

अनधिकृत फ्लेक्स काढा अन्यथा फ्लेक्स फाडो आंदोलन करणार – अमर कतारी

यानंतर जर काही तणावाची परिस्थिती निर्माण झाली तर त्या परिस्थितीला पूर्णतः ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी तसेच या विभागाचे सर्व अधिकारी जबाबदार राहणार आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/01/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर दि. – २३

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये राजकीय पक्षांच्या, बिगर राजकीय व व्यावसायिकांच्या फ्लेक्सला उधाण आले आहे. राजकीय नेत्याची छबी मिरवत हे फ्लेक्स विनापरवाना अनेक दिवसांपासून दर्शनी भागात लावण्यात आले आहे. या फ्लेक्सच्या माध्यमातून गावागावात तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते, त्यामुळे प्रशासनाने तात्काळ हे फ्लेक्स बोर्ड हटविण्याची मागणी करत यासाठी फ्लेक्स फाडो आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे (ठाकरे) माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी दिला आहे.

संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांना या संदर्भात शिवसेनेच्यावतीने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गुरुवारी निवेदन देण्यात आले. कतारी यांच्यासह युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अमित चव्हाण, प्रशांत खजुरे, राजू सातपुते, इम्तियाज शेख, फैजल सय्यद, अमोल डुकरे, दीपक साळुंके आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर शहर व तालुक्यामध्ये मागील दोन ते तीन महिन्यांपासून काही राजकीय पक्षांचे अनाधिकृत व शासकीय वेळेच्या पेक्षा जास्त काळ अभिनंदन फ्लेक्स लागलेली आहेत. हे सर्व नियमबाह्य असून जास्त दिवस फ्लेक्स राहिल्याने काही फाडतोड झाली तर गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते.

यामुळे गटविकास अधिकारी यांनी तातडीने ग्रामसेवकांना सार्वजनिक जागेतील सर्व अनाधिकृत फ्लेक्स काढण्याच्या सूचना द्याव्यात अन्यथा २७ जानेवारी नंतर “फ्लेक्स फाडो” आंदोलन उभारले जाईल, असा इशारा शिवसेनेचे अमर कतारी यांनी दिला आहे.

हे सर्व फ्लेक्स विनापरवानगी, अनधिकृत आहेत. त्यांची नगरपालिका अथवा ग्रामपंचायतकडे कोणतीही अधिकृत नोंदणी नाही आणि ते वेळेपेक्षा जास्त काळ सुद्धा लागले गेले आहेत. त्यामुळे गावचे विद्रूपीकरण झाले आहे. याबाबत संगमनेर तालुका ज्येष्ठ नागरिक संघानेही आंदोलन केले होते. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले.

त्यामुळे शिवसेनेने नगरपरिषद व पंचायत समिती यांना याबाबत सूचनाही केल्या होत्या. यानुसार नगर परिषदेने तातडीने कार्यवाही करून सर्व अनाधिकृत फ्लेक्स काढले यामुळे संगमनेर सुंदर दिसू लागले. आता पुन्हा हे फ्लेक्स लागू लागले आहे. ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवकांमध्ये असलेल्या उदासीनतेमुळे किंवा त्यांच्या लागेबंदामुळे सर्व फ्लेक्स तसेच आहेत. जास्त दिवस झाल्याने हे फ्लेक्स खराब होऊ शकतात आणि राजकीय तंटा निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे प्रत्येक ग्रामसेवकाने आपल्या हद्दीतील अनाधिकृत फ्लेक्स तातडीने काढून घेतले पाहिजे अन्यथा २६ जानेवारीच्या नंतर प्रत्येक गावात शिवसेनेचे पदाधिकारी गावनिहाय दौरा करणार असून त्यावेळी सर्व फ्लेक्सचे शूटिंग काढून ते गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले जाणार आहे आणि यानंतर त्या गावांमध्ये शिवसेनेकडून फ्लेक्स फाडो आंदोलन होणार आहे.

यानंतर जर काही तणावाची परिस्थिती निर्माण झाली तर त्या परिस्थितीला पूर्णतः ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी तसेच या विभागाचे सर्व अधिकारी जबाबदार राहणार आहेत.

म्हणून २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन असल्याने अनेक गावांमध्ये ग्रामसभा आहेत तत्पूर्वी ही सर्व फ्लेक्स काढले जावेत व नव्याने लागणाऱ्या बोर्डसाठी सुद्धा शासकीय नियमावली लागू करावी, अशी मागणी अमर कतारी यांनी केली आहे.


आश्वासन – शिवसेनेने दिलेल्या निवेदनानंतर या फ्लेक्स संदर्भात तातडीने कारवाई केली जाईल, असे आश्वासन गट विकास अधिकारी अनिल नागणे यांनी दिले असल्याचे कतारी यांनी म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,290
अनधिकृत फ्लेक्स अनिल नागणे अमर कतारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध गुटखा, सुगंधीत तंबाखू आणि मावा विक्री करणाऱ्या…

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.