Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » थोरात कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांचा खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते पुरस्कार देत सन्मान!
महाराष्ट्र संवाद विशेष

थोरात कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांचा खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते पुरस्कार देत सन्मान!

पुरस्काराची रक्कम भगवान बाबा गडाच्या विकासासाठी - पुरस्कारार्थी घुगरकर
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/01/2025Updated:26/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

पुणे –

पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा गौरव करण्यात आला असून कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांचा खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्यकारी संचालकांचा पुरस्कार देत सन्मान करण्यात आला आहे.

पुण्याच्या मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये २०२३-२४ यावर्षीचे विविध पुरस्कार खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते देत मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार जयंत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, खासदार विशाल पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, विवेक कोल्हे, नरेंद्र घुले, जयप्रकाश दांडेगावकर आदींसह राज्यभरातून मान्यवर उपस्थित होते.

२०२३-२४ चा उत्कृष्ट कार्यकारी संचालक पुरस्कार थोरात कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांना सपत्नीक देत त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. १ लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

शरद पवार म्हणाले, सहकार चळवळी राज्याच्या ग्रामीण विकासाचा पाया असून यामध्ये सहकारी साखर कारखान्यांची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे. प्रत्येक कारखान्याने आपला वेगळा ठसा या क्षेत्रात उमटविला असून यापुढील काळातही हा सहकार टिकविण्याची जबाबदारी सर्वांवर असेल. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी वाढविलेली संगमनेर मधील सहकार चळवळ देशासाठी दिशादर्शक ठरले असल्याचे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राज्यात साखर कारखानदारांना कारखाने चालवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यावर मात करून हा सहकार टिकवावा लागणार आहे. सरकारने कारखानदारीचे जवळचे नाते असून भविष्यात साखरेचे दर वाढणार असल्याचे संकेत देत प्रत्येक कारखान्यात आर्थिक शिस्त महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.

यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

पुरस्काराची रक्कम भगवान बाबा गडाच्या विकासासाठी – पुरस्कारार्थी घुगरकर

मिळालेला पुरस्कार हा कारखान्याचे सर्व कर्मचारी अधिकारी आणि सर्वांच्या परिश्रमाचा आहे. पुरस्काराचे श्रेय सर्वांना जाते. वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटने दहा हजारावरून या पुरस्काराची रक्कम एक लाख रुपयावर नेली आहे. पुरस्काराची ही रक्कम आपण भगवान बाबा गडाच्या विकासासाठी देणार असल्याचे जगन्नाथ घुगरकर यांनी सांगितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 695
जगन्नाथ घुगरकर पुरस्कार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या विरोधात अहिल्यानगर स्थानिक…

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.