५ वर्षीय बालिकेवर अत्याचार, आकाश कासारवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
तपास संगमनेर-अकोलेचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे व पोलीस निरीक्षक मोहन बोरसे करत आहेत.

अकोले, दि. १९ फेब्रुवारी –
पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आकाश संतु कासार (रा. शेरणखेल, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) याच्या विरोधात पोस्को कायदा कलम ४, ८, १२, ०९ (एम), अनुसूचित जाती जमाती कायदा कलम ३(२)(व्ही) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी आकाश कासार याने रविवारी (१६ फेब्रुवारी) सकाळी अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान पीडित पाच वर्षाच्या बालिकेला आईने घरी बोलावले आहे असे सांगून स्वतःच्या घरी नेले. तेथे त्याने या बालिकेवर लैंगिक अत्याचार केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
अकोले पोलिस ठाण्यात यासंदर्भात आरोपी आकाश कासार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास संगमनेर-अकोलेचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे व पोलीस निरीक्षक मोहन बोरसे करत आहे.

