Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एक वर्षाच्या आत संगमनेर बस स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा – आ. खताळ
धार्मिक

एक वर्षाच्या आत संगमनेर बस स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा – आ. खताळ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने मॅरेथॉन स्पर्धेचे बक्षीस वितरण
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. १९ फेब्रुवारी –

संगमनेर शहरातील बस स्थानकाच्या परिसरात अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे व अहिल्यानगरचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या अश्वारूढ पुतळ्याचे काम सुरू होणार असून एक वर्षाच्या आत हा पुतळा बसस्थानक परिसरातच उभा राहणार असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी संगमनेरकरांना दिला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने लहान व मोठ्या मुला-मुलींच्या मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विजयी ठरलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शिवचरित्राचे अभ्यासक चंद्रशेखर कानडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुभाष कोथमीरे, भाजपचे राम जाजू, शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, सकल मराठा समाजाचे राजाभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, माजी नगरसेवक अविनाश थोरात, शिवसेनेच्या संपर्कप्रमुख सुरेखा गव्हाणे, निलम खताळ, शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ राहणे, शहरप्रमुख दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी उपशहर प्रमुख अजित जाधव, आरपीआय (आठवले) पक्षाचे शहराध्यक्ष कैलास कासार, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, भारत गवळी, संपत गलांडे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खताळ म्हणाले, संगमनेर बस स्थानक परिसरात अश्वारूढ पुतळा व्हावा अशी संगमनेरकर जनतेची अनेक दिवसापासूनची मागणी होती. ती मागणी पूर्ण करणार असून या बस स्थानकाच्या आवारातच छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा होणार आहे. छत्रपतींचा मावळा म्हणून सर्वच घटकांना बरोबर घेऊन काम करण्याची भूमिका राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची शिकवण घेऊन येथून पुढील काळात काम करणार असल्याचे ते म्हणाले.

महायुतीच्यावतीने साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आपण केले होते. याबाबत मी स्वतः बसस्थानक परिसरात येऊन सर्वांशीच चर्चा केली होती. त्यांना सुद्धा आपण या शिवजयंती उत्सवात सहभागी होण्याची विनंती केली होती. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवामध्ये सुद्धा काही जणांनी राजकारण केले. हे दुर्दैवी असल्याचे आमदार खताळ यांनी म्हटले आहे.

मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे… छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अठरा वर्षाच्या पुढील मुलांच्या गटासाठी छत्रपती शिवाजी स्मारक ते घुलेवाडी फाटा आणि मुलीच्या गटासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते संगमनेर विधी महाविद्यालय मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या. या मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रोहित बिन्नर, द्वितीय क्रमांक ऋषिकेश वावरे, तृतीय क्रमांक दिनेश गुंजाळ, चतुर्थ क्रमांक सुनील गिऱ्हे, पंचम क्रमांक तुषार खुळे तसेच मुलींच्या गटात मुलींच्या मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक खुशी हासे, द्वितीय क्रमांक प्रणाली पोटकुले, तृतीय क्रमांक सरगम कासार, चतुर्थ क्रमांक वैष्णवी खताळ आणि पंचम क्रमांक सारिका लोगोटे व पुनम वाव्हळ यांना तर मुलींच्या लहान गटात श्रेया सानप, सानिका पवार, सानिका पवार, सार्थक गुंजाळ यांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र व सन्मानचिन्ह तसेच आकर्षक बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,284
अमोल खताळ छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा शिवजयंती उत्सव
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar06/09/20260

आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी प्राप्त…

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.