Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रेव्हेन्यु इंटीलिजन्सचे संगमनेर, कोल्हापूरसह देशात एकाच वेळी ११ ठिकाणी छापे, बहुतांश ठिकाणी बनावट भारतीय चलनी नोटा छापण्याचे प्रकार उघडकीस, नऊ जण अटकेत
गुन्हेगारी

रेव्हेन्यु इंटीलिजन्सचे संगमनेर, कोल्हापूरसह देशात एकाच वेळी ११ ठिकाणी छापे, बहुतांश ठिकाणी बनावट भारतीय चलनी नोटा छापण्याचे प्रकार उघडकीस, नऊ जण अटकेत

गुरुवारी (२० फेब्रुवारी) महाराष्ट्रामधील संगमनेर, कोल्हापूरमध्ये तर हरियाणा, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार या राज्यांमध्ये छापेमारी करण्यात आली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, दि. २२ फेब्रुवारी – 

बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारा कागद तस्करीच्या रूपाने बाहेरच्या देशातून कुरियर कंपनीच्या माध्यमातून भारतात आला असल्याची माहिती समोर आल्यानंतर केंद्रीय डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यु इंटीलिजन्सच्या पथकांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने देशभरात एकाच वेळी ११ ठिकाणी छापे टाकले. यात बहुतांश ठिकाणी बनावट नोटा छापण्याचे प्रकार सुरू असल्याचे समोर आल्याने नऊ जणांना अटक करण्यात आले आहे.

गुरुवारी (२० फेब्रुवारी) महाराष्ट्रामधील संगमनेर, कोल्हापूरमध्ये तर हरियाणा, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार या राज्यांमध्ये छापेमारी करण्यात आली. देशभरात टाकलेल्या ११ छापांमध्ये सात ठिकाणी बनावट चलनी नोटा छपाई सुरू असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी संगमनेरमध्ये गुंजाळवाडी ग्रामपंचायतच्या एका कर्मचाऱ्याला तर कोल्हापूरमध्ये दोघांना पथकाने अटक केली. त्यांच्याकडून काही बनावट नोटा आणि नोटा तयार करण्याची साधने जप्त करण्यात आले आहे.

संगमनेरमधील गुंजाळवाडीत पुण्याच्या डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यु इंटीलिजन्सच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने केलेल्या कारवाईत ग्रामपंचायत कर्मचारी रजनीकांत राजेंद्र राहणे याला पकडण्यात आले. राहणे याने हाय सेक्युरिटी थ्रेड असलेली रंगीत पट्टी असलेले पेपरचा वापर करुन एच पी कंपनीचा मॉडेल नं. Smart Tank 585 All in One printer Sr-No-TH4608WOXR या प्रिंटरचा वापर करुन भारतीय चलनातील खोट्या नोटा बनवण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच एका प्लास्टिक पिशवीमध्ये A-4 साईजचे शंभर पेपर आढळून आले.

बाहेरच्या देशातून मोठ्या प्रमाणावर हाय सिक्युरिटी आरबीआय ट्रेड पेपर (खोट्या नोटा बनविण्यासाठी वापरण्यात येणारा) भारत सरकारची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात महसुली नुकसान करत डीटीडीसी या कुरिअर कंपनीमार्फत देशभरात पाठवण्यात आल्याची तसेच अलिबाबा या वेबसाईटवरून हा पेपर संबंधितांनी मागविल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणांमध्ये मुंबईतील विक्रोळी पश्चिम येथे डीआरआयने सिक्युरिटी पेपर आयातदाराची ओळख पटवून त्याचा शोध घेतला आहे. कारवाईदरम्यान पन्नास शंभर आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा, लॅपटॉप, प्रिंटर, पेन ड्राईव्ह, सिक्युरिटी पेपर, A-4 साईज पेपर, महात्मा गांधींचे वॉटर मार्क असलेले बटर पेपर आदी यंत्रसामुग्री जप्त केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,346
कारवाई बनावट नोटा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.