Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक

July 26, 2026

रविवार विशेष लेख — हट्टी मोदींचे गर्वहरण!

July 26, 2026

आज, रविवार २६ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 26, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एसटी स्थानकातील उभ्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार, शिवसैनिकांकडून सुरक्षा केबिनची तोडफोड; पुणे पुन्हा हादरलं… आरोपीच्या शोधार्थ आठ टीम रवाना
गुन्हेगारी

एसटी स्थानकातील उभ्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार, शिवसैनिकांकडून सुरक्षा केबिनची तोडफोड; पुणे पुन्हा हादरलं… आरोपीच्या शोधार्थ आठ टीम रवाना

पीडित तरुणी पुण्यावरुन फलटणला जाण्यासाठी बसस्थानकावर आली. यावेळी संशयित आरोपीने तिला बस तिकडे लागली आहे, असं सांगून बसमध्ये नेलं. यावेळी नराधमाने बसमध्येत तिच्यावर बलात्कार केला.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरFebruary 26, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर बसमध्येच अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आक्रमक झालेल्या शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट डेपोमधील सुरक्षा रक्षकांच्या केबीनची तोडफोड केली. यानंतर शिवसैनिकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. यावेळी स्वारगेट बस डेपोत शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं. “आम्हाला पंधराशे रुपये नको पण, सुरक्षा द्या” असं म्हणत या महिलांनी जोरदार आंदोलन करत राज्याचे मुख्यमंत्रीही असणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

स्वारगेट डेपोमध्ये जिथं सुरक्षा रक्षकांची केबीन आहे. त्याच्या समोरच ही बस उभी होती. त्यामध्ये महिलेवर अत्याचाराची घटना घडली आहे. स्वारगेट आगारात २० सुरक्षा रक्षक असताना एका महिलेवर अन्याय झाला. ही निषेधार्य बाब आहे. म्हणून आम्ही तीव्र आंदोलन केलं, असं वसंत मोरे म्हणाले.

स्वारगेट बसस्थानकात एका २६ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. बुधवारी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दत्तात्रेय रामदास गाडे असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून त्याच्या शोधासाठी ८ पथकं रवाना केली आहेत.

या घटनेनंतर राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ज्या स्वारगेटला ही घटना घडली तिथे बस स्थानकाच्या जवळच पोलीस चौकी आहे. शिवाय पोलीस कर्मचारी बस स्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात. तरीही अशा पद्धतीचा घृणास्पद गुन्हा करण्याची आरोपीची हिंमत होते ही बाब गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही हे दर्शविणारी आहे.

या राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. पुण्यात दररोज कुठे ना कुठे गंभीर गुन्हे घडतच आहेत. त्यांवर आळा घालण्यात गृह खात्याला यश आलेलं नाही. ही घटना म्हणजे कायदा सुव्यवस्थेची कशा पद्धतीने दुर्दशा झाली याचं उदाहरण आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

पीडित तरुणी पुण्यावरुन फलटणला जाण्यासाठी बसस्थानकावर आली. यावेळी संशयित आरोपीने तिला बस तिकडे लागली आहे, असं सांगून बसमध्ये नेलं. यावेळी नराधमाने बसमध्येत तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरुन पोबारा केला. हादरलेल्या तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची ओळखही पटली असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची आठ पथकं रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,395
बलात्कार स्वारगेट बस स्थानक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026

संगमनेरमधील ‘मेडीकव्हर’चा काळा धंदा चव्हाट्यावर! महात्मा फुले योजनेच्या नावाखाली लाच मागणारे ‘रॅकेट’ लाचलुचपतच्या जाळ्यात, दोघांवर गुन्हा दाखल!

July 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक

By अनंत पांगारकरJuly 26, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर झालेल्या प्रत्येक लढाईमध्ये भारतीय जवानांनी अतुलनीय शौर्य…

रविवार विशेष लेख — हट्टी मोदींचे गर्वहरण!

July 26, 2026

आज, रविवार २६ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 26, 2026

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.