Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खासदार संजय राऊतांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारत केले दहन, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यावर संताप…
आंदोलन

खासदार संजय राऊतांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारत केले दहन, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यावर संताप…

बस स्थानकाच्या प्रवेशद्वारा बाहेर महायुतीतील पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. २७ फेब्रुवारी

विधान परिषदेच्या उपसभापती, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या बद्दल शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत गुरुवारी संगमनेरमध्ये राऊत यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत प्रतिमा दहन करण्यात आली.

बस स्थानकाच्या प्रवेशद्वारा बाहेर महायुतीतील पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन केले. यावेळी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा निषेध करण्यात आला, अशी माहिती संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या प्रसिद्धी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

यावेळी आमदार खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख कावेरी नवले, भाजपाच्या ओबीसी महिला मोर्चाच्या सरचिटणीस पायल ताजने, शिवसेना उप जिल्हाप्रमुख दिपाली वाव्हळ, तालुकाप्रमुख संगीता बांबळे, शहरप्रमुख वैशाली तारे, उपशहर प्रमुख मनीषा पंधारे या महिला पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे, रमेश काळे, शहरप्रमुख दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी राहुल खताळ, बाळासाहेब राऊत, सौरभ देशमुख, सुशील शेवाळे, आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, भाजप तालुका सचिव महेश मांडेकर, लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष मंजाबापू साळवे, निसार शेख, बबलू काझी, वरद बागुल, संदेश देशमुख, सुयोग गुंजाळ, सुयोग जोंधळे, गणेश आंबरे, मज्जू जागीरदार यांच्यासह महायुतीच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात कायमच महिलांचा सन्मान केला गेला. मात्र खा. संजय राऊत यांच्यासारखे मागच्या दाराने येऊन खासदार झालेले नेते छत्रपतींच्या महाराष्ट्रातील महिलांचा जर अपमान करत असेल किंवा त्यांच्याविषयी अपमानास्पद बोलत असेल ते निषेधार्य असल्याचे मत निलम खताळ, कावेरी नवले, पायल ताजने यांनी व्यक्त केले.

संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला कीड लावणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे खा. संजय राऊत यांनी शिवसेनेच्या उपनेते आणि विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य करून महाराष्ट्रातील महिलांच्या भावना दुखावल्या. राऊत यांना महायुती कधीही भीक घालणार नाही असा, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, तालुकाप्रमुख रमेश काळे राजेंद्र सोनवणे, शहरप्रमुख दिनेश फटांगरे व विनोद सूर्यवंशी, आरपी आयचे शहर अध्यक्ष कैलास कासार, भाजपचे तालुका सचिव महेश मांडेकर आणि लहुजी सेनेचे अध्यक्ष मांजाबापू साळवे यांनी म्हटले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 901
अमोल खताळ डॉक्टर नीलम गोऱ्हे शिवसेना संजय राऊत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.