Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निवेदन देण्यासाठी गेलेल्या छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांना पालकमंत्री, आमदारांसमोर महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण, संगमनेरमधील घटना
गुन्हेगारी

निवेदन देण्यासाठी गेलेल्या छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांना पालकमंत्री, आमदारांसमोर महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण, संगमनेरमधील घटना

गुरुवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संगमनेर नगर परिषदेमध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी संगमनेरचे आमदार अमोल खताळ उपस्थित होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. १३ मार्च 

मंत्री पदाची संविधानिक शपथ घेतल्यानंतर देखील दोन धर्मीयात जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणाऱ्या मंत्री नितेश राणे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, या मागणीचे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यासाठी गेलेल्या छात्र भारतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्यासमोरच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गुरुवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संगमनेर नगर परिषदेमध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी संगमनेरचे आमदार अमोल खताळ उपस्थित होते.

बैठक संपल्यानंतर पालकमंत्री व आमदार बाहेर पडत असताना छात्र भारतीचे कार्यकर्ते मंत्रिमंडळातून नितेश राणे यांची हकालपट्टी करा अशा घोषणा देत पालकमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी गेले असता “तुम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरून आला आहात हिंदूंच्या विरोधी बोलता”, असे म्हणत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री व आमदार यांच्यासमोरच कार्यकर्त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

पालकमंत्री व आमदार यांच्यासमोर हा प्रकार घडत असताना त्यांना कोणीही अडविण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी छात्र भारतीच्या विद्यार्थी नेत्यासह कार्यकर्त्यांना मारहाण केली. तर दुसरीकडे मारहाणीचे व्हिडिओ समाज माध्यमातून सर्वत्र व्हायरल झाले असून यात मारहाण करताना महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते दिसत आहे. मारहाणी दरम्यान कार्यकर्त्यांचे मोबाईल देखील काढून घेण्यात आल्याचे म्हटले आहे.

सकाळी घडलेल्या या प्रकारानंतर लगेचच कार्यकर्ते, पदाधिकारी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता उशिरापर्यंत पोलिसांनी कोणतीही तक्रार नोंदविली नव्हती. पोलिसांकडून तक्रार घेतली जात नसल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले होते. पालकमंत्री व आमदार यांच्यासमोरच हा प्रकार घडला असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान या संदर्भात पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,573
अमोल खताळ छात्र भारती मारहाण राधाकृष्ण विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.