Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर वन जमीन घोटाळा: अवैध नोंदी रद्द, दोषींवर कारवाईचे संकेत
पत्रकारिता

संगमनेर वन जमीन घोटाळा: अवैध नोंदी रद्द, दोषींवर कारवाईचे संकेत

या जमिनीवर भोगवटादार नाव लावून घेऊन नंतर त्या जमिनीचा मालक होण्याचे उद्योग राजकीय वरद हस्तामुळे संगमनेरमध्ये झाले आहेत.आता मात्र संगमनेर वर विशेष लक्ष केंद्रित केलेल्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यात लक्ष घातल्याने हे प्रकरण शेवटपर्यंत जाते का याकडे देखील लक्ष लागले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/03/2025Updated:24/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Kudzu covered forest in Charleston, Mississippi.
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. २४ मार्च – प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील चिकणी गावात वन जमिनीच्या बेकायदेशीर नोंदी करून जमिनी हडपण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. या प्रकरणी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत त्या सहा व्यापाऱ्यांच्या नावावर नोंद करण्यात आलेल्या व महसुली दस्तऐवज असलेल्या सातबारावरील अवैध नोंदी रद्द केल्या आहेत. तसेच, या प्रकरणात दोषी आढळलेल्या संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत महसूल विभागाच्या सूत्रांनी दिले आहेत.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील चिकणी गावात सुमारे ८० हेक्टर वन जमिनीवर काही व्यापाऱ्यांनी महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने बेकायदेशीर नोंदी केल्या होत्या. या नोंदींच्या आधारे सदर जमीन हडपण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या प्रकारातून राज्यभरात गाजलेल्या मुळशी पॅटर्नची पुनरावृत्ती होत असल्याचे दिसत होते.

मात्र, ही बाब माजी महसूल तथा विद्यमान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, महसूल विभागाने तत्काळ पावले उचलत अवैध नोंदी रद्द केल्या आहेत.

या प्रकरणी महसूल विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात दोषी आढळलेल्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. तसेच, या प्रकरणात सामील असलेल्या व्यापारी आणि शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल.

या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात शासकीय जमिनींच्या बेकायदेशीर नोंदी करण्याचे प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यापूर्वीही तालुक्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे महसूल विभागाने अधिक सतर्क राहून शासकीय जमिनींचे संरक्षण करणे आवश्यक बनले आहे. दरम्यान या घोटाळ्याप्रकरणी संबंधित बड्या धेंडांवर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.

शासनाच्या, गोरगरिबांच्या, शर्ती अटींच्या, बक्षीस, अहस्तांतरणीय जमिनींची लुटमार करण्याचा प्रकार संगमनेर तालुक्यात सुरू आहे. शासनाच्या जमिनीसह राखीव आणि गोरगरिबांच्या जमिनी देखील इथल्या राजकीय पुढारी, निवृत्त अधिकारी, डेव्हलपर्स, बिल्डर्स, उद्योजक मंडळींनी घशात घातल्या आहेत. फॉरेस्ट जमिनीवर डोळा ठेवून या जमिनी परस्पर खरेदी विक्री व्यवहार करून किंवा या जमिनीवर भोगवटादार नाव लावून घेऊन नंतर त्या जमिनीचा मालक होण्याचे उद्योग राजकीय वरद हस्तामुळे संगमनेरमध्ये झाले आहेत.आता मात्र संगमनेर वर विशेष लक्ष केंद्रित केलेल्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यात लक्ष घातल्याने हे प्रकरण शेवटपर्यंत जाते का याकडे देखील लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,258
कारवाई चिकणी चौकशी नोंदी रद्द वन जमीन घोटाळा संगमनेर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026

पत्रकारावर हल्ला करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार टोळीचे तोफखाना पोलिसांनी मोडले कंबरडे; केली ही मोठी कारवाई

26/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: समाजमाध्यमांच्या माध्यमातून खरेदी केलेल्या आणि नशेसह शारीरिक ताकदीसाठी बेकायदेशीरपणे…

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.