Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निळवंडेतील साईची कहाणी… डॉ. जोर्वेकर दांपत्याच्या सायकल भेटीने साईच्या स्वप्नांना बहर
सामाजिक

निळवंडेतील साईची कहाणी… डॉ. जोर्वेकर दांपत्याच्या सायकल भेटीने साईच्या स्वप्नांना बहर

संगमनेरमधील क्रॉस व्हीलचे संचालक राहुल वर्पे आणि अमोल शेलकर यांनी हर्क्युलस कंपनीची सायकल वाजवी दरात उपलब्ध करून दिली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/03/2025Updated:30/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. ३० मार्च – प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील क्रीडापटू आणि अत्यंत हुशार विद्यार्थी साई भाऊसाहेब केरे याला शाळेत ये-जा करण्यासाठी सायकलची गरज होती. शाळेतील शिक्षक अनिल कडलग यांनी ही बाब लक्षात घेऊन व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले.

साई केरे हा सातवीत शिकणारा विद्यार्थी अभ्यासात हुशार असून क्रीडा क्षेत्रातही त्याने विशेष प्राविण्य मिळवले आहे. लांब उडी, उंच उडी, धावणे, गोळा फेक, थाळीफेक यांसारख्या वैयक्तिक क्रीडा प्रकारांसह कबड्डी आणि खो-खो या सांघिक क्रीडा प्रकारातही त्याने जिल्हा पातळीवर यश मिळवले आहे. मात्र, साईची घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याला शाळेत ये-जा करण्यासाठी अडचणी येत होत्या. शाळा आणि घर यांच्यातील दोन-तीन किलोमीटरचे अंतर तो दररोज पायी चालत असे.

पुढील वर्षी आठवीच्या शिक्षणासाठी आणि क्रीडा क्षेत्रात आणखी प्रगती करण्यासाठी साईला वडगाव पान येथील शाळेत जायचे आहे. मात्र, घरापासून शाळेचे सहा-सात किलोमीटरचे अंतर त्याला त्रासदायक वाटत होते. शिक्षक अनिल कडलग यांच्या आवाहनाला संगमनेरमधील डॉ. जोर्वेकर हॉस्पिटलच्या संचालिका शोभना जोर्वेकर यांनी तातडीने प्रतिसाद दिला. डॉ. शोभना जोर्वेकर आणि डॉ. अरविंद जोर्वेकर यांनी साईला नवीन सायकल देण्याची तयारी दर्शवली.

डॉ. जोर्वेकर यांचा मुलगा चिराग, जो दिल्ली एम्समध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे, त्याने आपल्या पहिल्या पगारातील काही रक्कम सामाजिक कार्यासाठी देण्याची इच्छा व्यक्त केली होती. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर साईला सायकल मिळाल्याने त्याची गरज पूर्ण झाली आहे.

संगमनेरमधील क्रॉस व्हीलचे संचालक राहुल वर्पे आणि अमोल शेलकर यांनी हर्क्युलस कंपनीची सायकल वाजवी दरात उपलब्ध करून दिली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष रावसाहेब वारे, पालक दत्तात्रय केरे, विलास पवार, किरण उकिर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,403
अमोल शेलकर डॉ. जोर्वेकर सायकल भेट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: समाजमाध्यमांच्या माध्यमातून खरेदी केलेल्या आणि नशेसह शारीरिक ताकदीसाठी बेकायदेशीरपणे…

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.