Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मनसेची मान्यता काढून घ्या, सुनील शुक्ला याची न्यायालयात धाव; शुक्लाचा बोलवता धनी भाजप – संदिप देशपांडे
राजकारण

मनसेची मान्यता काढून घ्या, सुनील शुक्ला याची न्यायालयात धाव; शुक्लाचा बोलवता धनी भाजप – संदिप देशपांडे

शुक्लाच्या याचिकेनंतर मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी भाजपवर आरोप केले आहेत. प्रादेशिक पक्ष वाढू नयेत म्हणून हे भाजपचंच षडयंत्र आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई, दि. ८ एप्रिल विशेष – प्रतिनिधी

राज ठाकरे आणि मनसेविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. उत्तर भारतीयांविरोधात राज ठाकरे तिरस्कार पसरवत असून त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

उत्तर भारतीय विकाससेना नामक पक्षाच्या सुनील शुल्कांनी ही याचिका दाखल केली आहे. सुनील शुक्ला मुंबईचेच रहिवासी असून त्यांच्या पक्षाच्या कार्यालयावर गेल्या वर्षी मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. दरम्यान या शुक्लाचा बोलवता धनी हा भारतीय जनता पक्ष असल्याचा आरोप मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदिप देशपांडे यांनी केला आहे.

उत्तर भारतीयांविरोधात राज ठाकरे हिंसेला पाठिंबा देत असल्याचा आरोप सुनील शुक्लाने केला आहे. राज ठाकरेंविरोधात तक्रार दाखल करून पक्षाची मान्यता रद्द करा. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात राज्य सरकारला तसे आदेश द्यावेत, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

दुसरीकडे मनसे कार्यकर्त्यांनी आपल्याला धमकी दिल्याची तक्रार सुनील शुक्ला यांनी पोलिसात केली आहे. मनसे कार्यकर्त्यांकडून फोन करून आणि सोशल मीडियावरून धमक्या दिल्याची तक्रार त्यांनी केली आहे. शुक्लाच्या याचिकेनंतर मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी भाजपवर आरोप केले आहेत. प्रादेशिक पक्ष वाढू नयेत म्हणून हे भाजपचंच षडयंत्र आहे, असं देशपांडे म्हणाले.

याआधी हा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने अनेकदा केला. मात्र आता राज ठाकरेंची मनसे देखील असाच आरोप करू लागली आहे. मात्र संदीप देशपांडे यांनी केलेले हे आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळले आहेत.

शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मनसे मराठी भाषेचा आग्रह ठेवतो यात गैर काही नाही. मनसे जी गुंडगिरी दाखवत आहे ते चुकीचं आहे. मनसेच्या गुंड कार्यकर्त्यांवर कारवाई झालीच पाहिजे. मनसेची आंदोलन करण्याची पद्धत चुकीची आहे. शहरात नवीन आलेल्यांना मारहाण करणं चुकीचं आहे.

राज्यात, विशेषतः मुंबईत मराठी विरुद्ध हिंदी असा वाद वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठी न बोलता हिंदी बोलण्याची सक्ती काहींजणांकडून केली जात आहे. तसेच मराठी व्यक्तीला नोकऱ्यांमधून डावलण्यात येत आहे. त्याविरोधात मनसेने कडक भूमिका घेतली आहे. गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या भाषणामध्येही राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावरून इशारा दिला होता.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 558
महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचिका राजकारण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आर्थिक

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सोशल मीडियावरील रिल्स, भ्रामक ट्रेंड आणि ऑनलाइन चर्चांच्या…

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.