Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर १७ दिवसानंतर गुन्हा दाखल
गुन्हेगारी

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर १७ दिवसानंतर गुन्हा दाखल

आता या प्रकरणात पोलीस आणि प्रशासन काय कारवाई करतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – पुणे 

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी अखेर १७ दिवसानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अलंकार पोलीस ठाण्यात रुग्णालयातील प्रमुख स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १०६(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ससून रुग्णालयाच्या पुनर्तपासणी अहवालात डॉ. घैसास यांच्या वैद्यकीय निष्काळजीपणाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. याच अहवालाच्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पोलीस आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ससून प्रशासनाला विचारलेल्या चार प्रश्नांचा अहवाल आज प्राप्त झाला. या अहवालात डॉक्टरांनी वैद्यकीय निष्काळजीपणा केल्याचे नमूद आहे, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती देताना पोलीस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले, “ससून हॉस्पिटलकडून मागवलेल्या दुसऱ्या अहवालात आणि बी. जे. मेडिकल कॉलेजच्या अहवालानुसार डॉ. घैसास यांनी उपचारामध्ये निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा दाखवून वेळ घालवला, असे स्पष्टपणे नमूद आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कायद्यानुसार केला जाईल. शासनाच्या नियमांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. डॉ. घैसास यांची भूमिका या प्रकरणात दिसत आहे आणि त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. लवकरच डॉ. घैसास यांचा जबाब नोंदवला जाईल आणि त्यानंतर पुढील माहिती दिली जाईल.”

दरम्यान, सात महिन्यांची गर्भवती असलेल्या तनिषा भिसे यांना पोटात तीव्र वेदना आणि उच्च रक्तदाब जाणवल्याने २१ मार्च २०२५ रोजी इंदिरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारांसाठी २८ मार्च रोजी त्यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्वी डॉ. सुश्रुत घैसास यांच्याकडे उपचार घेतलेले असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवून भिसे कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला होता. मात्र, कुटुंबीयांच्या आरोपानुसार, गंभीर अवस्थेत असूनही रुग्णालयात तब्बल साडेपाच तास कोणतेही तातडीचे उपचार सुरू करण्यात आले नाहीत.

पीडित कुटुंबाने असाही आरोप केला आहे की, रुग्णावर तातडीने उपचार सुरू करण्याऐवजी रुग्णालय प्रशासनाने १० लाख रुपये एनआयसीयू डिपॉझिट भरल्याशिवाय त्यांना दाखल करण्यास नकार दिला. याच विलंबामुळे तनिषा यांची प्रकृती अधिक बिघडली आणि ३१ मार्च रोजी मणिपाल रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

ससून रुग्णालयाच्या पुनर्तपासणी अहवालातही डॉ. घैसास यांच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे यांच्यावर वेळेत उपचार होऊ शकले नाहीत, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूला डॉ. घैसास यांचा वैद्यकीय निष्काळजीपणा कारणीभूत ठरला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, संबंधित दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावरही चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. दुसरीकडे, मृत तनिषा भिसे यांच्या कुटुंबीयांनी न्यायासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आता या प्रकरणात पोलीस आणि प्रशासन काय कारवाई करतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 568
गुन्हा तनिषा भिसे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सुश्रुत घैसास
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध गुटखा, सुगंधीत तंबाखू आणि मावा विक्री करणाऱ्या…

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.