Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लाच प्रकरणी सहायक पोलिस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
गुन्हेगारी

लाच प्रकरणी सहायक पोलिस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

चोरीचे सोने विकत घेतल्याच्या आरोपाखाली तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये गु.र.क्र. ५६९/२४, भा.द.वी. कलम ३९४, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 24, 2025Updated:May 24, 2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर – 

अहिल्यानगरमधील एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब गोविंद काळे यांच्या विरोधात लाच मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलिस स्टेशनमधील एका गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी त्यांनी ७०,००० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका ३० वर्षीय व्यक्तीने अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), अहमदनगर येथे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या भावाने चोरीचे सोने विकत घेतल्याच्या आरोपाखाली तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये गु.र.क्र. ५६९/२४, भा.द.वी. कलम ३९४, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तक्रारदाराच्या भावाला आरोपी न करण्यासाठी, सहायक पोलिस उपनिरीक्षक काळे यांनी त्यांच्याकडे ७०,००० रुपयांची मागणी केली होती.

तक्रारीची शहानिशा करण्यासाठी ९ मे २०२४ रोजी पडताळणी करण्यात आली. त्यावेळी, पंचांसमक्ष काळे यांनी तक्रारदाराच्या भावाला गुन्ह्यात अटक होऊ नये यासाठी, सदर गुन्ह्यातील तपास अधिकारी यांच्या नावाचा बेकायदेशीर वापर करून ७०,००० रुपये लाचेची मागणी केली आणि ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली.

या पडताळणीनंतर, भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये सहायक पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब गोविंद काळे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,015
गुन्हा लाचखोरी लाचलुचपत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पत्रकारिता

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

By अनंत पांगारकरJuly 19, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मोहसीन शेख | संगमनेर अतिक्रमण निर्मूलनाच्या नावाखाली प्रशासनाने हातावर पोट असणाऱ्या…

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

July 18, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.