Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जोर्वे ग्रामसभेत भ्रष्टाचारावरून ‘राडा’, मागासवर्गीयांच्या निधीवरही प्रश्नचिन्ह; हिशोब मागताच सत्ताधाऱ्यांकडून गोंधळ
राजकारण

जोर्वे ग्रामसभेत भ्रष्टाचारावरून ‘राडा’, मागासवर्गीयांच्या निधीवरही प्रश्नचिन्ह; हिशोब मागताच सत्ताधाऱ्यांकडून गोंधळ

गेली ४० वर्षे जोर्वे गावात जे कधीही घडले नव्हते, तो मारामारी, शिवीगाळ आणि भांडणांचा प्रकार आज घडत होता. गावातील ज्येष्ठ मंडळींनी युवा पिढी थोड्या प्रलोभनांना बळी पडून असे वागत असेल, तर गावाचे भविष्य अवघड असल्याचे मत व्यक्त केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
ग्रामसभेतील गोंधळाची छायाचित्रे…

संगमनेर – प्रतिनिधी

जोर्वे गावात शुक्रवारी (३० मे) झालेली ग्रामसभा भ्रष्टाचाराच्या आरोपांनी चांगलीच गाजली. आदिवासी आणि विविध विकास कामांसाठी आलेला निधी नेमका कुठे गेला, या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी विखे समर्थक सत्ताधाऱ्यांनी ग्रामसभा गुंडाळण्याचा प्रयत्न केल्याने मोठा गोंधळ आणि राडा झाला. जनतेच्या कष्टाच्या पैशाचा गैरवापर झाल्याचा आरोप करत, गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या गैरकारभाराचा जाब विचारण्यासाठी ग्रामस्थ एकवटले होते.

ग्रामसभेला उपस्थित असलेल्या सामान्य जनतेने गावाच्या विकासासाठी आलेल्या निधीच्या गैरवापराबाबत सरपंच आणि ग्रामसेवकांना जाब विचारला. मात्र, त्यांच्याकडे समाधानकारक उत्तरे नव्हती. प्रश्नांची सरबत्ती सुरू असताना, सत्ताधाऱ्यांकडून प्रश्न विचारणाऱ्यांनाच धमकावणे, धक्काबुक्की करणे असे प्रकार सुरू झाले. विकासकामांचे डोंगर उभे केल्याचे सांगणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे एक-एक घोटाळे बाहेर येऊ लागताच, ते हमरी-तुमरीवर आले.

परिस्थिती इतकी बिघडली की, प्रश्न विचारणाऱ्यांची गच्ची पकडणे, लोटून देणे, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करणे असे प्रकार घडले. जनतेला अपेक्षित असलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराबाबत सरपंच आणि ग्रामसेवकांना काहीही सांगता आले नाही.

ग्रामस्थांनी सर्वच सदस्यांना धारेवर धरले असता, उपसरपंच बादशहा बोरकर आणि इतर सदस्यांनी आपली हतबलता बोलून दाखवली. “या ग्रामपंचायतीत कोणत्या वस्तू खरेदी केल्या जातात आणि कोणाला दिल्या जातात हे आम्हालाच कळत नाही. कोणता निधी कुठे वापरला जातो हेही सांगितले जात नाही. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी आलेला निधीही परस्पर दुसरीकडे वळवला जातो. वेगळ्याच माणसाच्या नावाने खाते उघडून त्यावर निधी वर्ग करून तोही पैसा लंपास केला जातो. छोट्या-छोट्या कामांचीही मोठी बिले काढली जातात,” असे धक्कादायक खुलासे त्यांनी केले.

हे ऐकून सर्वच ग्रामस्थ अवाक झाले. गेली ४० वर्षे जोर्वे गावात जे कधीही घडले नव्हते, तो मारामारी, शिवीगाळ आणि भांडणांचा प्रकार आज घडत होता. गावातील ज्येष्ठ मंडळींनी युवा पिढी थोड्या प्रलोभनांना बळी पडून असे वागत असेल, तर गावाचे भविष्य अवघड असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी सुरेश थोरात, सत्यजित थोरात, हर्षल काकड, उपसरपंच बादशहा बोरकर, संजय थोरात, संपत थोरात, मुकेश काकड, राहुल बोरकर, भाऊसाहेब दिघे, बालम भवर, माणिकराव यादव, राजू थोरात, रमेश दिघे, अक्षय दिघे, विठ्ठल काकड, पंढरीनाथ बलसाने, गगन थोरात, डॉ. पवन काकड, अजित थोरात, शुभम दिघे, शांताराम दिघे, अमित थोरात, अण्णासाहेब थोरात, कैलास क्षीरसागर, जीवन काकड, ऋषिकेश थोरात, बाळासाहेब काकड, संदीप यादव, दत्तू नाना काकड, शुभम दिघे आणि इतर ग्रामस्थ यांनी अनेक प्रश्नांचा भडीमार केला. सत्ताधाऱ्यांना एकाही प्रश्नाचे उत्तर देता न आल्याने त्यांनी गोंधळ घातला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 2,807
ग्रामसभा जोर्वे राडा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.