Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये चित्तथरारक दृश्य! बिबट्याने दिली चक्क कॅमेऱ्याला पोज, शिकार करून थेट शेतकऱ्यासमोर… बघा व्हिडिओ
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये चित्तथरारक दृश्य! बिबट्याने दिली चक्क कॅमेऱ्याला पोज, शिकार करून थेट शेतकऱ्यासमोर… बघा व्हिडिओ

जवळच असलेल्या उसाच्या शेतात एक बिबट्या बगळ्यांची शिकार करण्याच्या तयारीत दबा धरून बसला होता.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर, प्रतिनिधी: 
चित्रपटातील एखाद्या नायक-नायिकेला लाजवेल अशा थाटात कॅमेऱ्याला पोज देणाऱ्या एका बिबट्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द ते दाढ खुर्द रस्त्यावर न्याय दूध संस्थेच्या शेजारील शेतात ही थरारक घटना घडली, जिथे बिबट्या चक्क बगळ्यांची शिकार करण्यासाठी दबा धरून बसला होता.
बुधवारी (२५ जून) सायंकाळच्या सुमारास, आश्वी खुर्द येथील तरुण शेतकरी अभिषेक भवर हे आपल्या ट्रॅक्टरने शेतात नांगरणी करत होते. नांगरलेल्या शेतात बगळे किटकांना टिपत असताना, जवळच असलेल्या उसाच्या शेतात एक बिबट्या बगळ्यांची शिकार करण्याच्या तयारीत दबा धरून बसला होता. ट्रॅक्टर आणि उसाच्या शेतीतील अंतर केवळ पाच फुटांचे असतानाही, बिबट्याने अत्यंत शांतपणे दबा धरून होता.
या घटनेविषयी बोलताना शेतकरी अभिषेक भवर यांनी सांगितले, मी आजवर शेतात नांगरणी करताना अनेक बिबटे पाहिले आहेत. खरं तर तो एक वन्य प्राणी आहे आणि स्वतःच्या जीवाला घाबरून शिकार करताना मी त्याला अनेकदा पाहिले आहे. पण आजचा बिबट्या बहुधा खूप भुकेला असावा. त्याने एका झेपेत एक बगळा पकडला आणि शिकार फस्त करून तो पुन्हा माझ्या दिशेने येताना दिसला. त्यामुळे मी तात्काळ ट्रॅक्टर शेतातून बाहेर घेऊन निघालो. त्याचदरम्यान, मी माझ्या मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ काढला. बिबट्याने चक्क एक मिनिटापर्यंत ‘शूटिंग’साठी पोज दिली. एका क्षणासाठी तो जागेवरून हटला नाही, तर उलट सरीत त्याने अभिषेकला फोटो काढण्याची संधी दिली.
https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2025/06/VID-20250625-WA0042.mp4
बिबट्या दिसल्यास काय करावे? वन विभागाचा सल्ला…
बिबट्या दिसल्यास, घाबरून किंवा गोंधळून न जाता शांत राहण्याचा प्रयत्न करा. मोठ्याने आवाज करा. बिबट्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या. जर तुम्ही सुरक्षित ठिकाणी असाल, तर तिथेच थांबा आणि बिबट्या निघून गेल्यावरच बाहेर पडा. बिबट्या दिसल्यास, त्वरित वनविभागाला संपर्क साधा आणि त्यांना माहिती द्या. – सुभाष सांगळे वनपरिक्षेत्र अधिकारी संगमनेर भाग ३.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,670
बिबट्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.