Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सत्यजीत तांबेंच्या प्रयत्नांना यश: संगमनेर तालुक्यातील घुलेवाडीत १०० खाटांचे रुग्णालयाचे काम सुरू, आरोग्य सुविधात वाढ होण्यासाठी मिळणार मदत
राजकारण

सत्यजीत तांबेंच्या प्रयत्नांना यश: संगमनेर तालुक्यातील घुलेवाडीत १०० खाटांचे रुग्णालयाचे काम सुरू, आरोग्य सुविधात वाढ होण्यासाठी मिळणार मदत

शासनाच्या या निर्णयामुळे संगमनेर तालुक्यातील आरोग्य सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी: 

आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संगमनेर तालुक्यातील ग्रामीण आरोग्य सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार आहे. संगमनेरच्या घुलेवाडी येथील सध्याचे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय यापूर्वीच २०२२ मध्ये १०० खाटांच्या अद्ययावत रुग्णालयात श्रेणीवर्जित करण्यात आले असून, या नवीन रुग्णालयाचे बांधकाम सुरू असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सभागृहात दिली.

आमदार सत्यजीत तांबे यांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी, (१४ जुलै) संगमनेरमधील साकूर आणि घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयांच्या सद्यस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले होते की, या रुग्णालयांमध्ये डॉक्टर, कर्मचारी, औषधे आणि उपकरणांची मोठी कमतरता आहे, ज्यामुळे रुग्णांना उपचारात अडचणी येत आहेत. विशेषतः, साकूर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे काम रखडलेले असून, सध्या उपलब्ध असलेल्या १५ खाटा अपुऱ्या पडत असल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले होते.

आमदार तांबे यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले की, साकूर आणि घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालये प्रत्येकी ३० खाटांची मंजूर आहेत. तसेच, येथे आवश्यक अधिकारी, कर्मचारी, औषधे व उपकरणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. महत्त्वाचे म्हणजे, १३ ऑगस्ट २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार, घुलेवाडी येथील ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय १०० खाटांच्या अद्ययावत रुग्णालयात श्रेणीवर्जित करण्यात आले असून या १०० खाटांच्या रुग्णालयाचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर असून ते लवकरच पूर्ण होईल. त्यामुळे कामातील विलंबाचा प्रश्न आता उद्भवत नसल्याचेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.

शासनाच्या या निर्णयामुळे संगमनेर तालुक्यातील आरोग्य सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. घुलेवाडी येथे १०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय सुरू झाल्यावर परिसरातील नागरिकांना अद्ययावत आरोग्य सेवा मिळण्यास मदत होईल. आमदार सत्यजीत तांबे यांच्या अथक प्रयत्नांना यामुळे यश मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,557
आरोग्य ग्रामीण रुग्णालय तारांकित प्रश्न पावसाळी अधिवेशन प्रकाश आबिटकर सत्यजित तांबे साकुर रुग्णालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.