Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांवर केवळ ६८ शब्द: आमदार सत्यजित तांबे यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
राजकारण

सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांवर केवळ ६८ शब्द: आमदार सत्यजित तांबे यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा

तांबे यांच्या या महत्त्वपूर्ण मागणीमुळे, सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा समावेश करण्याच्या विषयावर पुन्हा एकदा प्रकाशझोत पडला आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/07/2025Updated:18/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त

मुंबई, विशेष प्रतिनिधी: 

महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार सत्यजित तांबे यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा पुरेसा समावेश नसल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. त्यांनी शालेय शिक्षणमंत्र्यांनी यावर लक्ष घालून योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली.

आमदार तांबे यांनी भाषणाची सुरुवात करताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा सीबीएसईच्या अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या प्रयत्नांसाठी शालेय शिक्षण विभाग आणि मंत्र्यांचे अभिनंदन केले. मात्र, यासोबतच त्यांनी एक महत्त्वपूर्ण चिंता व्यक्त केली. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये आणि सरकारी शाळांमध्ये या वर्षापासून सीबीएसईच्या धर्तीवर एनसीईआरटीचा अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तो एक स्तुत्य निर्णय आहे.

परंतु, याच अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची दखल पुरेशी घेतली गेली नसल्याचे तांबे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी सांगितले की, इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सीबीएसईच्या इतिहासाच्या एकूण २२०० पानांपैकी छत्रपती शिवाजी महाराजांवर केवळ ६८ शब्दच आहेत, ही बाब निषेधार्ह आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रातील मुलांपर्यंत आणि सीबीएसईच्या माध्यमातून देशातील मुलांपर्यंत पोहोचायलाच पाहिजे, असे ते म्हणाले.

या संदर्भात, तांबे यांनी शासनाकडून मिळालेल्या उत्तराचा उल्लेख केला, यात एससीईआरटीने एनसीईआरटीला याबाबतचा प्रस्ताव पाठवला असल्याचे नमूद केले होते. यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत तांबे यांनी म्हटले की, “इतका गंभीर मुद्दा असेल तर शासनाच्या वतीने आपण तातडीने दिल्लीला जायला पाहिजे होते आणि त्या मंत्र्यांशी बसून हा निर्णय करून घ्यायला पाहिजे होता. परंतु शासन यामध्ये उदासीन दिसते.”

आमदार तांबे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) अभ्यासक्रम हा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) दिल्ली यांच्यामार्फत तयार करण्यात येतो, तर राज्याचा अभ्यासक्रम एससीईआरटीच्या माध्यमातून तयार होतो. तसेच, शिक्षणमंत्री भुसे यांनी स्वतः केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना भेटून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सातवी आणि दहावीच्या अभ्यासक्रमात घेण्याबाबत केंद्रीय मंत्र्यांकडून आश्वासन मिळाल्याचे सांगितले.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2025/07/rms-ogW8KjoFmeZM.mp4

यावर आमदार तांबे यांनी पुन्हा आग्रही भूमिका घेतली आणि त्यांना उशिरा लक्षात आल्याचे म्हटले असले तरी, यापूर्वी देखील हे होऊ शकले असते असे म्हटले. शिक्षणमंत्र्यांनी आश्वासन दिले असले तरी, मी स्वतः दिल्लीला जाऊन यावर ठाम राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यासक्रमात समावेश करून घेईन, अशी ग्वाही आमदार तांबे यांनी दिली.

तांबे यांच्या या महत्त्वपूर्ण मागणीमुळे, सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा समावेश करण्याच्या विषयावर पुन्हा एकदा प्रकाशझोत पडला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 575
अभ्यासक्रम पावसाळी अधिवेशन सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या…

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.