Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, रविवार २६ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 26, 2026

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शहीद संदीप घोडेकर यांच्या कुटुंबीयांचे बाळासाहेब थोरात यांच्याकडून सांत्वन; स्मारकासाठी करणार पाठपुरावा
श्रद्धांजली

शहीद संदीप घोडेकर यांच्या कुटुंबीयांचे बाळासाहेब थोरात यांच्याकडून सांत्वन; स्मारकासाठी करणार पाठपुरावा

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अकोले नाका येथे संदीप घोडेकर यांचे स्मारक उभारण्यासाठी नगरपालिकेकडे जागेची मागणी केली असून, या मागणीसाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 19, 2025Updated:July 19, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी: 

संगमनेरचे सुपुत्र, वीर जवान संदीप किसन घोडेकर यांना देशसेवेत कर्तव्य बजावताना मरण आले. त्यांच्या निधनाबद्दल माजी महसूल मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, घोडेकर यांच्या देशसेवेतील योगदानाला संगमनेरकर सदैव स्मरणात ठेवतील, असे प्रतिपादन केले.

शुक्रवारी (१८ जुलै) बाळासाहेब थोरात यांनी घोडेकर मळा येथे शहीद संदीप घोडेकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वीरपत्नी वर्षा संदीप घोडेकर आणि मुलगा यश संदीप घोडेकर यांचे तसेच संपूर्ण कुटुंबाचे सांत्वन केले.

यावेळी थोरात म्हणाले की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन संदीप यांनी देशसेवेचे व्रत स्वीकारले होते. सैनिक सीमेवर अहोरात्र पहारा देत असतात, तर देशवासीय सण-उत्सव साजरे करत असतात. अशा वेळी हे जवान आपल्या घरापासून दूर राहून देशाचे रक्षण करतात. दिल्ली येथे सीआरपीएफमध्ये कार्यरत असताना जवान संदीप यांना कर्तव्य बजावताना वीरमरण आले.

संगमनेरच्या या सुपुत्राने देशासाठी दिलेल्या या सर्वोच्च बलिदानाचे आणि त्यांच्या योगदानाचा संगमनेरकरांना आणि संपूर्ण देशाला कायम अभिमान राहील, असेही थोरात यांनी नमूद केले. तसेच, काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अकोले नाका येथे संदीप घोडेकर यांचे स्मारक उभारण्यासाठी नगरपालिकेकडे जागेची मागणी केली असून, या मागणीसाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.

यावेळी बाळासाहेब थोरात यांच्यासमवेत माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, राजेश वाकचौरे, गजेंद्र अभंग, गणेश मादास, भाऊ गणेश किसन घोडेकर, भगवान घोडेकर, दिलीप म्हसे, सदाशिव घोडेकर, तुषार घोडेकर, जीवन पंचारिया, अनिल घोडेकर, सुनील घोडेकर आदींसह घोडेकर मळा परिसर आणि शहरातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी शहीद संदीप घोडेकर यांना अभिवादन केले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 931
जवान संदीप घोडेकर बाळासाहेब थोरात सांत्वन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने संगमनेरात शेतकऱ्यांचा दीड तासांचा महामार्ग रोको मागे शासकीय बफर स्टॉकमधून युरिया मिळताच आंदोलन स्थगनावर शिक्कामोर्तब; लिंकिंग आणि ढिसाळ नियोजनावरून महायुती सरकारवर कडाडून टीका

July 21, 2026

संगमनेरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे भक्तिमय वातावरणात आगमन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून स्वागत व पूजन

July 5, 2026

कोळवाडे येथे बुधवारी भव्य आदिवासी मेळावा

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, रविवार २६ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 26, 20260

आजचे राशीभविष्य ​मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या…

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

आज, शनिवार २५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 25, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.