

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त
संगमनेर, प्रतिनिधी:
विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या शुभेच्छा फलकासह शहरात लावण्यात आलेला माजी खासदार सुजय विखे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फ्लेक्स फाडल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र (एनसी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार खताळ यांचा खांडगाव फाट्यावरील फिक्स फाटल्याचे निदर्शनास आल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्या पाठोपाठ हा दुसरा प्रकार समोर आला.
अकोले नाका येथे जाजू पेट्रोल पंपासमोर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या फ्लेक्स लावण्यात आला होता या फ्लेक्स वर असलेले माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे छायाचित्र अज्ञात इसमाने फाडले असल्याचे सूर्यवंशी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.





आमदार खताळ यांचा खांडगाव फाट्यावरील फिक्स फाटल्याचे निदर्शनास आल्यानंतर