Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमुळे संगमनेरमधील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात, नागरिकांना मोठा दिलासा
राजकारण

ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमुळे संगमनेरमधील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात, नागरिकांना मोठा दिलासा

नाशिक-पुणे चौपदरीकरण महामार्गही बाळासाहेब थोरात यांच्याच पाठपुराव्यातून पूर्ण झाला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त

संगमनेर, प्रतिनिधी:

काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे संगमनेर तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावरील इंजिनिअरिंग कॉलेज गेटसमोरील हॉटेल स्टेटसजवळील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ३८ कोटी रुपये निधीतून साकारत असलेला हा उड्डाणपूल परिसरातील वाहतूक कोंडी कमी करून अपघातांना आळा घालणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

माझे घर सोसायटी परिसरातील नागरिकांसाठी हा उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. या ठिकाणी होणारे अपघात लक्षात घेता, थोरात यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून या प्रकल्पासाठी निधी मिळवला होता. सुरुवातीला एका बाजूचे काम पूर्ण झाले असले, तरी दुसऱ्या बाजूचे काम काही कारणास्तव प्रलंबित होते. सप्टेंबर २०२४ मध्ये बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा पुढाकार घेऊन हे काम वेगाने सुरू केले आणि स्थानिक नागरिकांचे प्रश्नही मार्गी लावले.

आता नाशिक जंक्शनवर दुसऱ्या बाजूचा उड्डाणपूल आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बायपासचे काम वेगाने सुरू आहे. हे काम लवकरच पूर्ण होणार असून यामुळे माझे घर सोसायटी, घुलेवाडी ग्रामस्थ, आदर्शनगर, वेल्हाळे, सायखिंडी, चिकणी, मालदाड येथील स्थानिक नागरिकांसह नाशिककडे जाणाऱ्या आणि नाशिकहून संगमनेरकडे येणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

विकासाच्या अनेक प्रकल्पांना थोरातांनी दिली गती- बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यात अनेक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती दिली आहे. संगमनेर शहरातील वाहनांची वर्दळ कमी करण्यासाठी त्यांनी तत्कालीन दळणवळण मंत्री सी. पी. जोशी यांच्याकडे पाठपुरावा करून ९ किलोमीटर लांबीचा बिना टोल बायपास मंजूर करून घेतला. २०१४ मध्येच हा बायपास नागरिकांसाठी खुला करण्यात आला, यामुळे शहरातील वाहतूक बाह्यमार्गाने वळवली गेली. याशिवाय, घुलेवाडी-सुकेवाडी बायपासमुळेही वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे.

संगमनेर शहराच्या सौंदर्यात भर घालणारा इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बस स्थानक हा महत्त्वपूर्ण ‘हॅपी हायवे’ रस्ताही त्यांच्या प्रयत्नांतून सुशोभीकरणासह पूर्ण झाला आहे.

नाशिक-पुणे चौपदरीकरण महामार्गही बाळासाहेब थोरात यांच्याच पाठपुराव्यातून पूर्ण झाला आहे. माझे घर सोसायटीजवळील उड्डाणपुलाची मागणी नागरिकांची होती. अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी त्यांनी हा मोठा उड्डाणपूल मंजूर केला. दिवाळीपूर्वीच त्यांनी या कामाला गती दिल्याने स्थानिक रहिवासी तुषार गोडगे, निखिल गुंजाळ, संतोष पुरी, दीपक पानसरे, संजय रहाणे, रामनाथ सोनवणे, निलेश सांगळे, राजेंद्र पानसरे, मच्छिंद्र ढमाले, अनिल दिघे, रुपेश धारणकर, शरद पानसरे, महेश पानसरे, प्रवीण पानसरे, संजय ढमाले, विक्रम ढमाले आदींनी समाधान व्यक्त करत थोरात यांचे अभिनंदन केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,281
उड्डाणपूल बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.